India Women Billionaires: Forbes च्या यादीत 'या' भारतीय उद्योगपती महिलांची झेप, आहेत अब्जाधीश

India Women Billionaires 'या' महिला उद्योगपती आहेत  भारतातील सर्वात श्रीमंत महिला, Forbes च्या यादीत निर्माण केलं स्वतःचे स्थान  

Updated: Dec 1, 2022, 06:05 PM IST
India Women Billionaires: Forbes च्या यादीत 'या' भारतीय उद्योगपती महिलांची झेप, आहेत अब्जाधीश title=
India Women Billionaires These Indian business women are billionaires in the Forbes list nz

India Women Billionaires 2022: Forbes दरवर्षी जगातील श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर करते. यंदा ही Forbes नं भारतातील 100 श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. त्यात गौतम अदानी (Gautam Adani) यांना भारतातील श्रीमंत व्यक्तीचा खिताब मिळाला आहे. त्याचबरोबर त्या यादीत काही महिलांचे नाव देखी आहे. या यादीमुळे अनेकांना माहिती मिळते. या यादीकडे लोकांचं लक्ष लागून राहीलेले असते. तुम्हाला माहितेय का India Global Rich List 2022 मध्ये भारतातील महिलांची नावे समाविष्ट आहेत. तर मग चला जाणून घेऊया त्या महिला आहेत तरी कोण? (India Women Billionaires These Indian business women are billionaires in the Forbes list nz)

1. सावित्री जिंदाल (Savitri Jindal)
सावित्री जिंदाल या एक यशस्वी व्यावसायिक महिला तसेच राजकारणात सक्रिय आहेत. त्या ओपी जिंदाल ग्रुपच्या अध्यक्षा आहेत आणि एकूण16 अब्ज 40 कोटी रुपयांच्या मालक आहेत. त्यांची कंपनी धातू आणि खाण क्षेत्रात जास्त कामाई  करते.

 

2. रेखा झुनझुनवाला (Rekha Jhunjunwala)
रेखा झुनझुनवाला या ज्येष्ठ उद्योगपती आणि गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी आहेत, ज्यांना शेअर बाजारातील (Share Market) बिल बुल म्हणून ओळखले जाते. एकूण $5.9 अब्ज संपत्तीसह त्या भारतातील 30 व्या सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे.

 

3. फाल्गुनी नायर (Falguni Nayar)
लाइफस्टाइल (Lifestyle) आणि ब्युटी प्रोडक्ट (Beauty Product) निर्मात्या Nykaa च्या CEO फाल्गुनी नायरचे नाव देखील भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत समाविष्ट आहे. त्यांची एकूण संपत्ती 4.08 अब्ज डॉलर्स आहे.

 

4. लीना तिवारी (Leena Tiwari)
लीना तिवारी या USV प्रायव्हेट लिमिटेडच्या मालक आहेत, ही कंपनी फार्मा आणि बायोटेक क्षेत्रात काम करते. भारताच्या 2022 च्या फोर्ब्स इंडिया रिच लिस्टमध्ये लीना तिवारीचे नाव देखील आले आहे.

 

5. दिव्या गोकुळनाथ (Divya Gokulnath)
दिव्या गोकुलनाथ यांचे नाव भारतातील दिग्गज टेक उद्योगपतींच्या यादीत समाविष्ट आहे. त्यांनी 2011 मध्ये BYJU कंपनीची स्थापना केली. त्यांची एकूण संपत्ती सध्या $3.6 अब्ज आहे.

 

6. किरण मुझुमदार-शॉ (Kiran Mazumdar-Shaw)
किरण मुझुमदार-शॉ हे Biocon Limited and Biocon Biologics Limited कंपनीचे संस्थापक आहेत. ही कंपनी बायोटेक क्षेत्रात काम करते. किरण मुझुमदार-शॉ यांच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे तर ते $2.7 बिलियन इतकी आहे.