नवी दिल्ली : भारतीय सिमेवर पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे. तसेच काश्मीर खोर सातत्याने धगधगते ठेवण्यासाठी दहशतवाद्यांचा वापर करण्यात येत आहे. दहशतवाद्यांचा बिमोड करण्यासाठी भारतीय लष्कराने पावले उचलली आहेत. लष्कराने काश्मीर खोऱ्यात सक्रीय असलेल्या १२ दहशतवाद्यांची यादी जाहीर केली आहे.
या यादीत काही महत्वाची नावे समाविष्ट असून लष्कर-ए-तोयबाचा अबु दुजाना, हिजबूल मुजाहिद्दीनचा रियाज उर्फ जुबैर आणि झकीर राशीद भट उर्फ झकीर मुसा यांचा समावेश आहे.
Indian Army has released a list of 12 most-wanted terrorists active in J&K including Lashkar commanders Abu Dujana and Bashir Wani pic.twitter.com/8eYR7Ri1ax
— ANI (@ANI_news) June 1, 2017
हिजबूल मुजाहिद्दीनचा कमांडर सबजार अहमद भट्ट ठार झाल्याच्या काही दिवसानंतर लगेचच ही यादी जाहीर करण्यात आली आहे. काश्मीरमधील त्राल येथे लष्करासोबत झालेल्या चकमकीत सबजार अहमद ठार झाला होता. सबजार ठार झाल्यानंतर रियाज तथा जुबैरला हिजबूल मुजाहिद्दीनचा कमांडर म्हणून निवडतील अशी शक्यता आहे.
बुरहान वानीला ठार करण्यात आल्यानंतर सबजार अहमदने त्याची जागा घेतली होती. मात्र आता तोदेखील ठार झाला असल्याने जागा रिक्त आहे.