पाकिस्तानात अंजू बनली फातिमा! सुनेबद्दल भारतातल्या सासरच्यांनी केला मोठा खुलासा

Anju aka Fatima: भारतातून पाकिस्तानात गेलेल्या अंजूबद्दल दररोज नवनवे खुलासे होत आहेत. पाकिस्तानात अंजूने नसरुल्लाहबरोबर निकाह केल्याचं समोर आल्यानंतर तिला मोठमोठ्या भेटवसतू मिळत आहेत  पाकिस्तानमधल्या एका बिझनेसमनने अंजूला चक्क जमीनच गिफ्ट केली आहे. 

राजीव कासले | Updated: Jul 29, 2023, 05:36 PM IST
पाकिस्तानात अंजू बनली फातिमा! सुनेबद्दल भारतातल्या सासरच्यांनी केला मोठा खुलासा title=

Anju aka Fatima: भारतातून पाकिस्तानात गेलेल्या अंजूनने (Anju) नसरुल्लाहबरोबर (Nasrullah) निकाह केला असून आता तिचं नाव फातिमा असल्याचा खुलासा झालाय. नसरुल्लाहच्या कुटुंबियांनी आणि नातेवाईकांनी अंजू आणि नसरुल्लाहला अनेक भेटवस्तू दिल्या आहेत. आता आणखी एक माहिती समोर आली आहे. अंजूच्या पहिल्या पतीच्या घरच्यांनी दिलेल्या माहितीनुसार अंजूला सुरुवातीपासूनच श्रीमंतांसारखं राहाणीमान (Luxury Life) आवडायचं. अरविंदबरोबर लग्न झाल्यानंतर लगेचच ती सासरच्यांपासून वेगळं राहु लागली. त्याआधी ती सासरच्यांबरोबर राजस्थानमधल्या भिवाडी इथं राहात होती. पण नंतर पतीबरोबर वेगळं राहाण्याचा तीने हट्ट सुरु केला. 

पती अरविंदनेही तिच्यासाठी वेगळं घर घेतलं. राजस्थानमधल्या उच्चभ्रू परिसर असलेल्या एलिगेंस सोसायटीत अंजू पती आणि मुलांबरोबर शिफ्ट झाली. अंजूमुळे अरविंद लहान भाऊ आणि आई-वडिलांशी कमी बोलू लागला होता असा खुलासा तिच्या सासरच्यांनी केलाय. अंजू आणि अरविंदचं 17 वर्षांपूर्वी अरेंज्ज मॅरेज झालं. त्यांना दोन मुलं असून मोठ्या मुलीचं वय 15 थर लहान मुलाचं वय 7 वर्ष आहे. 

पाकिस्तानात अंजूला महागडं गिफ्ट
पाकिस्तानमधले बडे उद्योगपती पाक स्टार ग्रुप ऑफ कंपनीचे मालक मोहसिन खान अब्बासी यांनी अंजू आणि नसरुल्लाहला अनेक भेटवस्तू दिल्या आहेत. दुसऱ्या देशातून आलेल्या महिलेने इस्लाम धर्म स्विकारला आहे. त्यामुळे आपली जबाबदारी आहे की त्या महिलेला कोणत्याही समस्येची जाणीवर होता कामा नये असं या उद्योगपतीने म्हटलं आहे. अब्बासी यांची स्टार कंपनी रिअल इस्टेट क्षेत्रात काम करते. या कंपनीच्यावतीने अंजू उर्फ फातिमाला नवं घर बांधण्यासाठी जमीन दिली जाणार आहे. याशिवाय अंजूचे पाकिस्तानमध्ये राहण्याची सर्व कागदपत्र पूर्ण झाल्यानंतर तिला नोकरीही दिली जाणार आहे. यासाठी तिला कामावर जावं लागणार नाही तर घरी बसूनच पगार मिळणार असल्याची घोषणाही अब्बासी यांनी केली आहे. 

अंजू उर्फ फातिमा आणि नसरुल्लाह यांना पाकिस्तान सरकारनेही सर्वतोपरी मदत करावी अशी विनंती मोहसिन खान अब्बासी यांनी केली आहे. इतकंच नाही तर पाकिस्तानमधल्या इतर उद्योगपतींनीही अंजू आणि नसरुल्लाहला मदत करण्याचं आवाहन केलं आहे. पाकिस्तान भरपूर श्रीमंत लोकं असून त्यांनी मदतीसाठी पुढे यावं असं अब्बासी यांचं म्हणणं आहे. भारतातून आपलं घर सोडून पाकिस्तानात आलेल्या अंजूने इस्लाम धर्म स्विकारलाय. इस्लाम धर्मात तिला सर्व सुखसुविधा मिळायला हव्यात. जेणेकरुन इतर लोकंही इस्लाम धर्म स्विकारतील. अंजू भारत सोडून पाकिस्तानात आली आहे असं तिला कधीच वाटता कामा नये, पाकिस्तान हेच आपलं घर आहे, आणि इथे आपण सुरक्षित आहोत अशी तिची भावना झाली पाहिजे असं अब्बासी यांनी म्हटलंय. 

पाकिस्तानात तिचा होणार पाहुणचार पाहता अंजू पुन्हा भारतात परतेल याची शक्यता फारच कमी आहे. राजस्थानमधून अंजू पाकिस्तानात गेली. पाकिस्तानात आपण सुरक्षित असल्याचा दावा अंजूने केला आहे. इतकंच नाही तर भारतात येण्याजोगी परिस्थिती नसल्याचंही तिने म्हटलंय. 

मध्यप्रदेशमधल्या ग्वालिअरमध्ये जन्मलेली अंजू उत्तर प्रदेशच्या कैलोर गावात मोठी झाली. लग्न होऊन ती राजस्थानमधल्या भिवाडी इथं राहयला गेली. 21 जुलैला अंजून पती आणि आपल्या दोन मुलांना सोडून पाकिस्तानात गेली. जयपूरमध्ये एका मैत्रिणीला भेटायाल जात असल्याचं सांगून अंजू घरातून निघून गेली होती. तर ज्या कंपनीत अंजू काम करत होती, तिकडे तीने गोव्याला बहिणीकडे जात असल्याचं सांगितलं होतं.