Indian Railways, Ticket Transfer: भारतीय रेल्वेला देशाची लाईफलाइन म्हटंले जाते. भारतातील मोठी संख्या रेल्वेनं प्रवास (Travel) करते. त्यामुळे रेल्वे प्रशासन भारतीय प्रवाशांसाठी नवनवीन टेक्नीकल बदल करत असते. प्रवाशांना (Passengers) प्रवास करताना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी सुद्धा रेल्वे प्रशासन घेत असते. अनेकदा रेल्वे प्रशासन नवीन नियम लागू करते तर काही नियमांमध्ये आवश्यक बदल देखील करते. आज आम्ही तुम्हाला अशाच एका नियमाविषयी सांगणार आहोत ज्याचा तुम्हाला भविष्यात रेल्वे प्रवास (Railway Travel) करता फायदा होईल... (Indian Railways IRCTC Suddenly changed your mind canceling the Railway Ticket)
Indian Railways : दिवसेंदिवस भारतीय रेल्वे आपले नेटवर्क मजबूत करत आहे. तरी आजही आपल्याला आरामदायी सीट मिळताना त्रास जाणवतो. असं अनेकदा होते, जेव्हा एखाद्याला काही कामामुळे तिकीटचे रिझर्वेशन (Reservation) रद्द (Cancel) करावे लागते आणि त्याजागी दुसऱ्या व्यक्तीला पाठवण्यासाठी मोठ्या अडचणी येतात.
अशा वेळेस रिझर्वेशन रद्द करुन पुन्हा नव्याने रिझर्वेशन करावे लागते. असे करताना वेळ आणि पैसे दोन्ही खर्च होतात. पण अशा परिस्थितीत तुम्हाला तिकीट (Ticket) मिळेल याची काही शाश्वती नसते. प्रवाशांच्या या अडचणी लक्षात घेत भारतीय रेल्वेने काही दिवसांपूर्वी नियमांमध्ये काही बदल केले आहेत. जाणून घेऊया नेमके कोणते बदल भारतीय रेल्वेने केले आहे...
आणखी वाचा... Lifestyle : तुम्ही स्वत:वर वेळ खर्च करता का? नसेल करत तर करुन पाहा...
तुम्ही तिकीट ट्रान्सफर कोणाला करु शकता?
रेल्वेच्या नियमांनुसार जर तुमचे रिझर्वेशन आधीच झाले आहे आणि काही कामानिमित्त तुम्हाला तुमचे रिझर्वेशन कॅन्सल करावे लागते. पण तुम्हाला तिकीट कुटुंबातील अन्य व्यक्तीला द्यायचे असेल तर तुम्ही तिकीट ट्रांसफर (Ticket Transfer) करु शकता. आई, बाबा, बहिण, भाऊ, नवरा, बायको यांपैकी कोणालाही तुम्ही तुमचे तिकीट देऊ शकता. ज्या व्यक्तीला तुम्ही तिकीट ट्रांसफर करत आहात, ती व्यक्ती तुमच्या ओळखीची (Identity) आहे, की नाही याची काळजी घ्या.
कसे कराल इतरांना तिकीट ट्रांसफर
ट्रेन सुटण्याआधी तुम्हाला आरक्षण केंद्रावर जावे लागेल. आरक्षण केंद्रावरुनच तुम्ही तिकीट ट्रांसफर करु शकता. याकरिता कुटुंबातील व्यक्तीला स्वतःचे ओळखपत्र काउंटरवर सादर करावे लागेल. तुम्हाला काउंटरवर अर्ज (Application) देखील करावा लागेल. यानंतर बुकिंग क्लर्क पीएनआर (PNR) नंबरच्या तिकीटावर दुसऱ्या व्यक्तच्या नावावर तिकीटाची नोंदनी होईल.
आणखी वाचा... Home Loan चा EMI संपल्यानंतर या 5 बाबी लक्षात ठेवा, नाहीतर याल अडचणीत