नवी दिल्ली : जर तुम्ही ट्रेनने प्रवास करण्याचे नियोजन करीत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. अचानक जर तुमच्या आरक्षणाचे टिकिट हरवले तर तुम्ही विना टिकिट प्रवास करीत आहात. असा अर्थ होतो. जाणून घ्या अशा स्थितीत काय करायला हवे.
डुप्लिकेट ट्रेन टिकिट बनवणे
जर तुमच्या ट्रेनचे टिकिट हरवले आहे तर विचलित होण्याची गरज नाही. कारण रेल्वेलादेखील माहिती असते की, ही सामन्य गोष्ट असते. यासाठी भारतीय रेल्वे आपल्या प्रवाशांसाठी नवीन सुविधा देत असते. जर तुमच्या ट्रेनचे डुप्लिकेट टिकिट बनवून प्रवास करता येतो. यासाठी थोडे अधिक शुल्क भरावे लागते.
डुप्लिकेट टिकिटसाठी अतिरिक्त चार्ज
भारतीय रेल्वेचे संकेतस्थळ indianrail.gov.in तर्फे आरक्षण चार्ट तयार होण्याआधी कन्फर्म/RAC टिकिट हरवल्यास त्याऐवजी डुप्लिकेट टिकिट जारी करण्यात येते. त्यासाठी स्लिपर क्लासला 50 रुपये तर दुसऱ्या क्लाससाठी 100 रुपये द्यावे लागतील.
जर आरक्षण चार्ट तयार झाल्यानंतर टिकिट हरवले तर टिकिट दराच्या 50 टक्के रक्कम भरून डुप्लिकेट टिकिट मिळवता येते.
5 महत्वपूर्ण गोष्टी
1 जर टिकिट कन्फर्म/RAC आहे आणि फाटले किंवा कट झाले तर एक डुप्लिकेट टिकिट घेता येते. त्यासाठी आरक्षण चार्ट तयार झाल्यानंतर प्रवाशाला एकूण भाड्याच्या 25 टक्के शुल्क अतिरिक्त द्यावे लागते.
2 वेटिंग लिस्टच्या फाटलेल्या टिकिटांसाठी कोणतेही डुप्लिकेट टिकिट तयार होत नाही.
3 टिकिट फाटलेले असेल आणि त्याची सत्यता पडताळणी झाली असेल तर, टिकिटवर रिफंडदेखील स्विकार होतो.
4 RAC टिकिटांच्या बाबतीत आरक्षण चार्ट तयार झाल्यानंतर कोणतेही डुप्लिकेट टिकिट जारी करताय येत नाही.
5 जर डुप्लिकेट टिकिट जारी झाल्यानंतर ओरिजनल टिकिट मिळाले तर, दोन्ही टिकिटांसाठी ट्रेन निघण्याआधी रेल्वे प्रशासनाला दाखवल्यास डुप्लिकेट टिकिटासाठी मोजण्यात आलेले अतिरिक्त शुल्क परत केले जाते.