श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलानं मंगळवारी जैश ए मोहम्मदचा कमांडर सज्जाद भट्ट याला कंठस्नान घातलंय. अनंतनागमध्ये सज्जाद भट्ट यांच्यासोबत आणखीन एक दहशतवादी ठार झालाय. उल्लेखनीय म्हणजे, याच सज्जाद भट्टच्या गाडीचा वापर करून १४ फेब्रुवारी रोजी पुलवामामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला घडवून आणण्यात आला होता.
याशिवाय पुलवामा आयईडी स्फोटाच्या मास्टरमाईंडलाही ठार करण्यात आलंय. हा दहशतवादी १७ जून रोजी पुलवामामध्ये सेनेच्या गाडीवर झालेल्या आयईडी स्फोटाचा मास्टरमाईंड होता. सध्या, सुरक्षादलाकडून पुलवामा आणि अनंतनागमध्ये सर्च ऑपरेशन राबवण्यात येत आहे.