श्रीनगर: जम्मू काश्मीरच्या ग्रेनेड हल्ला झाला आहे. या हल्ल्यामध्ये सीआरपीएफच्य़ा 2 जवानांसह एक पोलीस जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार जम्मू-काश्मीरच्या बारामुला जिल्ह्यात ग्रेनेड हल्ला झाला आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या ग्रेनेड हल्ल्यात एक स्थानिक जखमी झाला आहे.
बरामुला परिसरात शुक्रवारी दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. या हल्ल्यामध्ये तीन जवान जखमी झाले आहेत याशिवा स्थानिक नागरिकही जखमी झाल्याची माहिती मिऴाली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार खानपूरा पुलाजवळ सुरक्षा दलावर ग्रेनेड हल्ला केल्याची माहिती दिली आहे. दरम्यान परिसरात घेराव घालण्यात आला असून आता सर्च ऑपरेशन सुरू आहे.
Two CRPF jawans and a policeman were injured in a grenade attack in Baramulla town. Details awaited: Jammu and Kashmir Police
— ANI (@ANI) July 30, 2021
Jammu & Kashmir: Visuals from the spot where two CRPF jawans and a policeman were injured in a grenade attack in Baramulla town.
(Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/qZo4UzzzQ3
— ANI (@ANI) July 30, 2021
दुसरीकडे पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहेत. जमिनीवरून घुसखोरी आणि हल्ल्याचा डाव यशस्वी न झाल्याने सीमेजवळच्या गावात ड्रोन हल्ला करण्याचा मनसुबा होता. मात्र त्यांची ही चाल ओळखून सुरक्षा दलानं वेळीच सतर्क राहून ही चाल हाणून पाडली आहे. सांबा जिल्ह्यामध्ये रात्री तीन वेगवेगळे ड्रोन नष्ट करण्यात सुरक्षा दलाला यश मिळालं आहे.