नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी (JNU) चे कुलगुरु (vice chancellor) जगदीश कुमार यांना पदावरून दूर करण्याची मागणी करत विद्यार्थी आणि शिक्षकांनी 'दिल्ली मार्च'चं आयोजन केलं होतं. यासाठी आंदोलक युनिव्हर्सिटी ते मंडी हाऊसपर्यंत पायी चालत जाणार होते. परंतु, जेएनयू गेटवरच पोलिसांनी त्यांना रोखलंय.
विद्यार्थी मात्र आंदोलनाच्या निर्णयावर ठाम आहेत. विद्यार्थी रस्त्यावर उतरलेले पाहून सुरक्षा व्यवस्थेत आणखीन वाढ करण्यात आलीय.
दरम्यान, जेएनयूचे व्हाईस चान्सलर जगदीश कुमार यांनी झी न्यूजशी साधलेल्या संवादात मात्र परिस्थिती सामान्य असल्याचं म्हटलंय. रविवारी घडलेली घटना दुर्दैवी आहे. केंद्रानं युनिव्हर्सिटी बंद करण्याची सूचना दिलेली नाही. काही आंदोलक युनिव्हर्सिटीला बंदी बनवू शकत नाहीत. या विद्यार्थ्यांना काही शिक्षकांकडून आणि विद्यार्थ्यांकडून फूस लावण्याचं काम केलं जातंय.