Jobs in Indian Army | भारतीय सैन्यात अधिकारी होण्याची संधी; ग्रॅजुएट असाल तर लगेच अप्लाय करा

भारतीय सैन्यात अधिकारी बनन्याचे स्वप्न पाहणाऱ्या युवकांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय सेनाने टेरिटोरिअल आर्मीच्या अंतर्गत ऑफिसर पदांवरील भरतीसाठी अर्ज मागितले आहेत. इच्छुक आणि योग्य उमेदवार जे या पदासाठी अप्लाय करू इच्छिता त्यांना Indian Army च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अप्लाय करता येईल.

Updated: Aug 8, 2021, 07:50 AM IST
Jobs in Indian Army | भारतीय सैन्यात अधिकारी होण्याची संधी; ग्रॅजुएट असाल तर लगेच अप्लाय करा title=

नवी दिल्ली : भारतीय सैन्यात अधिकारी बनन्याचे स्वप्न पाहणाऱ्या युवकांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय सेनाने टेरिटोरिअल आर्मीच्या अंतर्गत ऑफिसर पदांवरील भरतीसाठी अर्ज मागितले आहेत. इच्छुक आणि योग्य उमेदवार जे या पदासाठी अप्लाय करू इच्छिता त्यांना Indian Army च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अप्लाय करता येईल.

jointerritorialarmy.gov.in या संकेतस्थळावर जाऊन पदासाठी अप्लाय करता येईल.

या पदांसाठी अप्लाय करण्याची शेवटची तारीख 19 ऑगस्ट 2021 आहे. त्याशिवाय उमेदवार सरळ या लिंकवर क्लिक करून अप्लाय करू शकता.
https://www.jointerritorialarmy.gov.in/join-as-anofficer

या  पदासाठीचे नोटीफिकेशन वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
http://www.jointerritorialarmy.gov.in/upload

महत्वाच्या तारखा
ऑनलाईन अप्लाय सुरू करण्याची तारीख 20 जुलै
ऑनलाईन अप्लाय करण्याची शेवटची तारीख 19 ऑगस्ट
परीक्षेची तारीख 19 ऑगस्ट 2021

टेरिटोरिअल आर्मी ऑफिसर पदासाठी उमेदवाराचे वय 18 ते 42 वर्षे असायला हवे. तसेच कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यालयातून पदवी घेतलेली असावी.

उमेदवारांना या पदासाठी 200 रुपयांचे शुल्क भरावे लागेल.

उमेदवारांना प्रादेशिक सेना समुह मुख्यालयाद्वारे लेखी परीक्षा देणे गरजेचे असेल. त्यानंतर मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल. अंतिम निवड SSB आणि मेडिकल बोर्डच्या चाचणीनंतर होईल