नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात आज भाजपा आणि काँग्रेसच्या वकिलांकडून, युक्तिवाद करण्याचा आटापिटा सुरू होता, त्या दरम्यान न्यायाधीशांनी, कर्नाटक निवडणुकीशी संबंधित, 'रिसॉर्ट पॉलिटिक्स'वर, वरील फोटोत दिसत असणारा 'व्हॉटसअॅप' जोक वाचून दाखवला, आणि उपस्थित क्षणात खळखळून हसले, कोर्टात बाजू मांडण्याच्या ताण-तणावात असलेले दोन्ही बाजूचे वकील जरा रिलॅक्स झाले. खरं तर वरील फोटोत दिसत असणारा, 'रिसॉर्ट पॉलिटिक्स' हा जोक मागील २ ते ३ दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आमदारांची फुटाफुट होवू नये, म्हणून भाजपा आणि काँग्रेस-जेडीएसकडून आमदारांची लपवा लपवी सुरू आहे. कर्नाटकात जे रिसॉर्ट पॉलेटिक्स सुरू झालं आहे, त्यावर न्यायाधीशांनी आपल्या ठेवणीतील व्हॉटस अॅप जोक तीनही पक्षांच्या वकिलांना वाचून दाखवला. राजकीय पक्षांनी नव्हे तर ज्या रिसॉर्टमध्ये आमदार लपले आहेत, त्यांनीच कसा दावा सरकार स्थापनेचा दावा केला असा हा जोक आहे.
सर्वोच्च न्यायालयाने भाजपाला उद्या दुपारी ४ वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करा, असा निकाल दिला आहे, दोन-तीन दिवस नाही, तर अवघ्या २४ तासांच्या आत भाजपाला बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. आणि जर भाजपाने बहुमत सिद्ध केलं नाही, तर ही संधी काँग्रेस-जेडीएसला द्यावी लागणार आहे. यामुळे आता भाजपाची खरी राजकीय कसोटी लागणार आहे. घोडेबाजार थांबवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने उद्या दुपारी ३ ते ४ वाजेची वेळ ही सर्वोच्च न्यायालयाला दिली आहे. न्यायालयात सध्या निकालाचं वाचन सुरू आहे.भाजापाचे वकिलांनी मात्र सोमवारपर्यंतची वेळ मागितली होती.