केरळ : केरळमधील पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामुळे सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे. ज्यामुळे राज्य पोलिसांवर जोरदार टीका होत आहे. व्हिडीओमध्ये एक पोलीस कर्मचारी विना तिकीट ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या व्यक्तीला वारंवार लाथ मारताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर झाल्यानंतर त्या पोलिस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे.
सुमारे 20 सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये रेल्वेच्या डब्यात दरवाजाजवळ बसलेल्या एका व्यक्तीला पोलिस वारंवार लाथ मारताना दिसत आहेत. वारंवार लाथ मारल्यामुळे ट्रेनमध्ये बसलेली व्यक्ती खाली पडते. हे सगळं घडत असताना तेथे आणखी एक पोलिस कर्मचारी आणि एक रेल्वे अधिकारी तेथे उपस्थीत होते. ही घटना मावेली एक्स्प्रेस ट्रेनमधील आहे. रविवारी रात्री या ट्रेनमध्ये हा सगळा प्रकार घडला.
मीडियारिपोर्टनुसार, व्हिडीओमध्ये दिसणारा पोलिस कर्मचारी एएसआय आहे. तो आणि दुसरा पोलीस कन्नूरहून ट्रेनमध्ये चढला आणि प्रवाशांची तिकिटे तपासू लागला. तिकीट नसल्याच्या संशयावरून त्यांनी पीडिताला मारहाण केली आणि तो दारूच्या नशेत असल्याचा पोलिसांचा दावा आहे. वडकारा येथे त्याला ट्रेनमधून खाली उतरवण्यात आले.
I want to request to Kerla Govt. & Indian Railway to Punish hardly this police man this is not fair in Democracy. If possible punish same as it in public to this police. @CMOKerala @KeralaGovernor @Cptvmcity @RailMinIndia pic.twitter.com/RapkEp492S
— Rajeev Jha (@jharajeevmohan) January 4, 2022
सोशल मीडियावर लोक रेल्वे कर्मचारी आणि तिथे उभ्या असलेल्या इतर पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी करत आहेत. एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, "काल मावेली एक्स्प्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाला पोलिसांनी बेदम मारहाण केली. हा तमाशा बघत उभा असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला थांबवण्या टीटीईने थांबवले नाही, त्यामुळे या टीटीईला देखील सेवेतून बडतर्फ केले पाहिजे."
कन्नूरचे पोलीस अधीक्षक पी. एलांगोवन यांनी सोमवारी प्रसारमाध्यमांना सांगितले की, या प्रकरणाचा अहवाल विशेष शाखेच्या एएसपीकडून मागवण्यात आला आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, या घटनेत सहभागी असलेला पोलिस कर्मचारी केरळ रेल्वे पोलिसात प्रतिनियुक्तीवर आहे. रेल्वे पोलिसही या घटनेचा तपास करत असल्याचे त्यांनी सांगितले.