बंगळुरु : काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांनी पार्टी अध्यक्ष यांच्याकडे राजीनामा दिला आहे. त्यामुळे कर्नाटक सरकार कोसळण्याच्या मार्गावर आहे. काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी पोहचले आहेत. तर जी परमेश्वर यांच्या घरी आधीपासूनच मुख्यमंत्री कुमारस्वामी उपस्थित आहेत. पक्षाच्या हितासाठी राजीनामा दिल्याचे मंत्र्याचे म्हणणे आहे.
सर्व मंत्र्यांनी आपला राजीनामा माजी अध्यक्षांकडे सुपूर्द केला. आता पुढे काय होणार ? 22 पैकी 22 मंत्र्यांनी राजीनामा देत काँग्रेसने सरकारला मोठा धक्का दिला आहे. रविवारी अमेरिकेहून बंगळुरुला पोहोचलेल्या मुख्यमंत्री कुमारस्वामी एचडी कुमारस्वामी यांनी आपल्या पार्टीच्या आमदारांसोबत मिटींग घेतली.
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि कॉंग्रेस नेता जी परमेश्वर यांच्यासोबत देखील त्यांनी चर्चा केली. पण यातून काहीच स्पष्ट झाले नाही. इथे मुंबईत आलेले 10 आमदार राजीनाम्यावर अडून असून त्यांनी बंगळुरुला परतण्यास नकार दिला आहे. जी परमेश्वर यांनी सरकारमध्ये सहभागी असलेल्या काँग्रेसच्या मंत्र्यांना ब्रेकफास्टवर आमंत्रित केले होते.