प्रताप नाईक, झी मीडीय म्हैसुर: कर्नाटकात सिद्धरामय्या आणि त्यांचा मुलगा यथींद्र या दोघांच्याही मतदारसंघातली लढत रंगतदार होणार आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या म्हैसुर जिल्ह्यात जे.डी.एस आणि भाजापानं कडवं आव्हाण निर्माण केल आहे. मुख्यमंत्री ज्या मतदारसंघातू उभे रहाणार आहेत, त्या चामुंडेश्वरी मतदारसंघात मुख्यमंत्र्यांना घेरण्याची रणणीती भाजापा आणि जे.डी.एसनं आखलेली आहे. त्यामुळं संपूर्ण कर्नाटकच लक्ष या चामुंडेश्वरी मतदारसंघात मुख्यमंत्री सिद्धरामय्या याचं काय होणार याकडच लक्ष लागुन राहिलय. पाहुया काय आहेत त्यांच्यासमोरची आव्हानं कर्नाटकाच्या रणसंग्राममध्ये
कुणी अरे केलं तर, त्याला लगेच का रे म्हणणारे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे म्हैसूर जिल्ह्यातल्या सिद्धरामणवुंडीचे... म्हैसुर शहराशेजारच्या वरुणा विधानसभा मतदारसंघाच ते नेतृत्व करतात. पण यंदा मात्र त्यांनी परंपरागत मतदारसंघ मुलगा यथींद्रला दिलाय.... आणि सिद्धरामय्या शेजारच्या चामुंडेश्वरी मतदारसंघातून निवडणूक लढवतायत... मुख्यमंत्री झाल्यापासून सिद्धरामय्या होम पीच असलेल्या म्हैसूर जिल्ह्याकडे गांभीर्यानं लक्ष देत नाहीत, अशी ओरड होते.... या मतदारसंघातून जनता दल सेक्युलरनं माजी मंत्री जी. टी. देवेगौडासारखा तगड्या उमेदवाराला निवडणुक रिंगणात उतरवलंय.... त्यातच म्हैसुरेच भाजपा खासदार प्रताप सिम्हा हे जे.टी.देवेगौडा यांना मदत करत असल्याची चर्चा आहे. तर भाजपकडून गोपाल राव रिंगणात आहेत. त्यामुळच चामुंडेश्वरीची लढत सिद्धरामय्यांसाठी प्रतिष्ठेची झालीय.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपला मुलगा डॉ. यथेंद्रला वरुणा विधानसभा मतदारसंघातुन तिकीट मिळवुन दिल.. या मतदारसंघात येडीयुराप्पा यांचा मुलगा विजेंद्र याने निवडणुक लढवावी असा आग्रह भाजापा कार्यकर्ते आणि स्वता विजेंद्र याचा स्वत:चा होता. पण भाजापामधीलच येडीयुराप्पा यांचे विरोधक असणाऱ्या नेत्यांनी विजेंद्रा विजेंद्र याला तिकीट मिळु नये यासाठी मोठा प्रयत्न केला आणि त्याचाच फटका भाजापा या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात बसताना दिसुन येतोय. भाजापानं विजेंद्र याला तिकीट नाकारल्यानं वरुणा विधानसभा मतदार संघात सिद्धरामय्यांचे चिरंजीव यथेंद्र यांचा मार्ग काही अंशी सोपा झालाय. विजेंद्र याचं तिकीट नाकारल्यानं त्यांचे कार्यकर्ते संतापलेत... त्यामुळेच भाजप कार्यकर्त्यांनी भाजपऐवजी नोटाला मतदान करण्याचं अभियान सुरू केलंय...