बंगळुरू : कर्नाटक विधानसभा निवडणुकीची मतमोजणी अद्यापही सुरू असली तरी भाजपला निर्णायक बहुमत मिळालंय, हे स्पष्ट झालंय. कानडी कौल पाहता बंगळुरूमध्ये भाजपच्या मुख्यालयाच्या बाहेर जोरदार जल्लोष सुरू झालाय.
BJP workers celebrate outside party office in #Bengaluru as trends show the party leading. #KarnatakaElectionResults2018 pic.twitter.com/utBwcXwBme
— ANI (@ANI) May 15, 2018
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २१ रॅली केल्या होत्या. जाहीर भाषणं केलेल्या १६९ पैंकी १०० जागांवर भाजपला यश मिळालंय.
सध्याच्या आकड्यांनुसार, कर्नाटकच्या सर्व म्हणजेच २२२ जागांचा कल हाती आलाय. भाजपला ११२ जागांवर आघाडी मिळालीय... म्हणजेच भाजप मॅजिक फिगर गाठण्यात यशस्वी ठरलंय. त्यामुळे आता, कर्नाटकात भाजप आपल्या बळावर सरकार स्थापन करणार असल्याचं चित्रं उघड झालंय. कर्नाटक हे १६ वं राज्य ठरलंय जिथं भाजप सरकार आपल्या बळावर सरकार स्थापन करणार आहे.
तर दुसरीकडे कर्नाटक हे काँग्रेसनं हातातून गमावलेलं १२ वं राज्य ठरलंय. काँग्रेसकडे आता उरलेत केवळ ३ राज्य उरलेत.