बंगळुरु: कर्नाटकात काँग्रेसच्या अडचणी आणि राज्य सरकारमधील जलसंपदा मंत्री डी.के. शिवकुमार यांच्या समस्या वाढत आहेत. कथित कर चुकविल्याप्रकरणी शिवकुमार यांना न्यायालयाने चौथ्यांदा समन्स पाठविला आहे. आयकर विभागाचे एका वरिष्ठ अधिकारी सांगितले की, मंगळवारी आर्थिक गुन्हेगारीशी संबंधित खटले सुनावणाऱ्या एका विशेष न्यायालयाने शिवकुमार यांच्याविरोधात चौथा समन्स जारी करण्यात आला आहे.
नाव न सांगण्याच्या अटीवर या अधिकाऱ्याने माहिती दिली. न्यायालयाने समन्स जारी केले आहे. आणखी एक तक्रार दाखल केली गेली आहे. गेल्यावेळी तीन होत्या. विषय एकच आहे. मात्र, वर्ष वेगवेगळी आहेत. कथित कर चुकविल्याचे प्रकरण आहे. आयकर विभागाचे सूत्रांनी सांगितले की, सचिन नारायण, सुनील कुमार शर्मा, अंजय, हनुमंतैया आणि राजेंद्र आणि शिवकुमार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील कुमार आणि अजयया यांच्या घरावर छापे घातल्यानंतर काही कागदपत्रे आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली. यासंबंधी आयकर खात्याने नोटीस बजावली आहे. त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागितले. देण्यात आलेले स्पष्टीकरण समाधानकारक नाही, असे आयकर विभागाने स्पष्ट केलेय.
शिवकुमार यांनी सांगितले की, त्यांना आतापर्यंत समन्स मिळालेले नाही. ते म्हणाले, 'मी नुकताच वर्तमानपत्रांत वाचले आहे. तीन प्रकरणे आधीच नोंदणी केली गेली आहे. आता विधानसभा निवडणुकीनंतर एक आहे.
शिवकुमार म्हणाले की, आयकर विभागातील अधिकारी मला श्वास घेऊ देत नाही. माझ्याबाबतीत असं का होत आहे. तेच समजत नाही. जे मीडियाला ठिक वाटेल ते दाखवा. तुम्हाला योग्य वाटेल ते छापा, असे सांगत मला हे अधिकारी श्वास घेण्यास देत नाहीत. केवळ मीच का यांना दिसतो, हे मला समजत नाही?