करुणानिधी यांना अखेरचा निरोप

करुणानिधींच्या अंत्यदर्शनासाठी लोटला जनसागर

Updated: Aug 8, 2018, 05:23 PM IST
करुणानिधी यांना अखेरचा निरोप title=

चेन्नई : डीएमके पक्षाचे नेते करुणानिधी यांचं वयाच्या 94 व्या वर्षी निधन झालं. पण त्यांच्या अंत्यसंस्कारावरुन वाद निर्माण झाला होता. करुणनिधी यांच्या पार्थिवावर मरीना बीच येथे अंत्यसंस्कार करण्यात यावे अशी त्यांच्या कुटुंबियांची आणि कार्यकर्त्यांनी मागणी आहे. करुणानिधी यांच्यावर अंत्यसंस्कारासाठी अण्णा स्मारकाजवळची जागा देण्यास राज्य सरकारने नकार दिल्याने वाद निर्माण झाला. मद्रास हायकोर्टामध्ये सुनावणी झाल्यानंतर आता करुणानिधींच्या अत्यसंस्काराचा मार्ग मोकळा झाला आहे. मरिन बीचवरच करुणानिधी यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

- करुणानिधींच्या अंत्ययात्रेला सुरुवात

- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुला आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफ्फुल पटेल यांनी घेतलं करुणानिधींचं अंत्यदर्शन

- मरिना बीच येथे करुणानिधी यांच्या दफनविधीची तयारी सुरु

- राहुल गांधी यांनी घेतलं करुणानिधींच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन

- अंत्यदर्शनासाठी कायकर्त्यांची गर्दी, पोलिसांचा लाठीचार्ज 

- करुणानिधी यांच्या निधनामुळे राज्यसभा आणि लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं आहे.

- करुणानिधी यांच्या अंत्यदर्शनासाठी जनसागर लोटला आहे. कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे. राजाजी हॉल येथे करुणानिधी यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलं करुणानिधींच्या पार्थिवाचं दर्शन

 

- कोर्टाच्या निर्णयानंतर डीएमकेचे नेते एमके स्टॅलिन यांना अश्रृ अनावर

करुणानिधींच्या अंत्यसंस्काराचा मार्ग अखेर मोकळा, मरिना बीच येथेच होणार करुणानिधींवर अंत्यसंस्कार

- करुणानिधी यांच्या अंत्यदर्शनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी चेन्नईला पोहोचले. 

- तामिळनाडूतील मरिन बीचवर मोठ्य़ा प्रमाणात सुरक्षा तैनात