जम्मू काश्मिर : शेवटी आईच्या अश्रूनेच एका दहशतवाद्याला बदलले. कुटूंबसोडून कट्टर दहशतवादी गेला होता बनायला....
फुटबॉलपट्टू ते दहशतवादी असा भयंकर प्रवास असलेल्या माजिद खानने शुक्रवारी सुरक्षा दलासमोर आत्मसमर्पण केले आहे. रक्षा विभागाच्या सुत्रांकडून ही माहिती मिळाली. माजिद खान जम्मू - काश्मिरच्या अनंतनाग परिसरातील राहणारा आहे. तसेच तो उत्तम फुटबॉल खेळाडू देखील आहे. गेल्याच आठवड्यात त्याने फुटबॉल सोडून बंदूक हातात घेतल्याचं समोर आलं होतं. असं सांगितलं जातं होतं की तो लश्कर - ए - तौयबामध्ये सहभागी होणार होता.
दहशतवाद्यात सहभागी झाल्याची बातमी माजिदच्या कुटुंबियांना मिळताच ते हैराण झाले. एवढंच नाही तर माजिदची आई आशियाने एक व्हिडिओ करून आपल्या मुलाल पुन्हा घरी येण्याची विनंती देखील केली होती. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल करण्यात आला. माजिद फुटबॉलपट्टू असण्याबरोबरच बी कॉमचा विद्यार्थी देखील आहे.
काही दिवसांपूर्वी माजिद गायब झाला. त्यानंतर तयार करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये माजिदच्या आईने त्याला निरोप दिला होता की, बाळा एकदा घरी ये. माझी आणि तुझ्या वडिलांची हत्या करून तू कुठे जायचंय तिथे निघून जा. एवढंच नव्हे तर माजिदच्या वडिलांनी ही माहिती मिळताच त्यांना हृदय विकाराचा झटका आला. या घटनेने त्यांच्या घरात एक शांतता पसरली. आता आत्मसमर्पण केल्याचे कळताच माजिदच्या कुटुंबियांनी सुटकेचा निश्वास सोडला. घरात आनंदाचे वातावरण आहे.