मुंबई : पुद्दुचेरीच्या राज्यपाल आणि माजी आयपीएस अधिकारी या सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमुळे चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. सूर्यातून ओम असा आवाज ऐकू येत असल्याचा दावा त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केला आहे. या पोस्टवर नेटिझन्सनी बेदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. काही नेटकऱ्यांनी तो व्हिडिओ खोटा असल्याचं सांगितलं आहे तर कही नेटकऱ्यांनी त्या व्हिडिओवर विश्वास ठेवला आहे.
त्यामुळे सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. बेदी यांनी कोणत्याही प्रकारचं कॅप्शन न देता व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओमधून ओम असा आवाज ऐकू येत आहे. त्या व्हिडिओमध्ये नासा ने हा आवाज रेकोर्ड केल्याचे म्हटले आहे. (NASA Recorded Sound of Sun)
— Kiran Bedi (@thekiranbedi) January 4, 2020
Mam this one is real pic.twitter.com/RzWNYhvRBM
— Tempest (@ColdCigar) January 4, 2020
Kiran Bedi be like . . pic.twitter.com/kQ5G0iNcDg
— #IndiaDoesNotSupportCAA Einstein (@DesiPoliticks) January 4, 2020
त्यामुळे सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय बनला आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ एकुण २२ हजार पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. शिवाय ७ हजारांपेक्षा जास्त नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
शिवाय बेदींच्या ट्विटनंतर या व्हिडिओवर अनेक मीम देखील व्हायरल होत आहेत. बहुतांशी जणांनी हा व्हिडिओ फेक असल्याचा दावा करत वैज्ञानिक दृष्टीकोण जपण्याचा सल्ला किरण बेदी यांना दिला आहे.