मुंबई : रस्त्यावरील सायकल असो, बाईक असो की, हवेत उडणारे विमान असो, सर्व वाहनांमध्ये टायर हे असतेच. त्यात वाहनांमधील टायर पंचर होताना किंवा फुटताना तुम्ही अनेकदा पाहिले किंवा ऐकले असेल. तर बऱ्याचदा वाहनांच्या टायरला जास्त घर्षण झाल्यामुळे आग लागल्याचे देखील तुम्ही पाहिले असेल. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की एखादे विमान एक टन वजनाने उतरते तेव्हा त्यांचे टायर का फुटत नाहीत. परंतु यामागे विज्ञान आणि तंत्रज्ञान आहे. याबद्दल आणखी सविस्तर माहिती आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत.
बिझनेस इनसाइडरच्या रिपोर्टनुसार, जेव्हा विमान जमिनीवर उतरते, म्हणजेच लँडिंग दरम्यान त्याचा वेग ताशी 250 ते 300 किलोमीटर असतो आणि तेवढ्याच वेगाने त्याचे जमीनीसोबत घर्षण होते. परंतु असे असून देखील हे टायर फुटत नाही, कारण या विमानाच्या टायरच्या रब्बरमध्ये अॅल्युमिनियम आणि स्टील दोन्ही मिसळलेले असते.
हे सर्व एकत्र करून विमानाचे टायर तयार केले जातात आणि कारच्या टायरपेक्षा 6 पट जास्त दाबाने हवा भरली जाते. त्यामुळे ते अधिक वजनाचा भार सहन करण्यास सक्षम आहे.
अनेक वेळा घर्षणामुळे टायरला आग लागते, हे तुमच्या लक्षात आले असेल. हे टाळण्यासाठी विमानाच्या टायरमध्ये नायट्रोजन वायू भरला जातो. नायट्रोजन देखील इतर वायूंपेक्षा कोरडा आणि हलका आहे. त्याचा तापमानाचा परिणाम होत नाही आणि त्यामुळे आग लागत नाही. हा वायू ऑक्सिजनवरही प्रतिक्रिया होऊ देत नाही. त्यामुळे, वेग वाढल्यानंतर आणि गरम झाल्यानंतर फुटत नाहीत.
विमानाचे टायर खूप मजबूत बनवलेले असतात. त्याचे एक टायर सुमारे 38 टन वजन हाताळण्यासाठी तयार केले आहे. फक्त एका टायरच्या मदतीने, लँडिंग आणि टेकऑफ 500 वेळा करता येते. त्याचे टायर मजबूत असल्यामुळे त्यावर पकड असते. यामुळे ते अधिक वेळा वापरले जाऊ शकते. टायरला किमान 7 ग्रिप बसवता येतात. त्यानुसार एका टायरमधून 3500 वेळा लँडिंग आणि टेकऑफ करता येणार आहे.