मुंबई : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडिओमध्ये एक वानर कर्नाटक स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनची (KSRTC) बस चालवताना दिसत आहे. बस ड्रायव्हर सीटवर बसलेलाही दिसतोय. वानर स्टेयरिंगवर बसलंय आणि त्यानंच स्टेयरिंग सांभाळलंय... हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बस ड्रायव्हरची नोकरी मात्र धोक्यात आलीय.
#WATCH Viral video from Karnataka's Davanagere of a KSRTC bus driver driving with a Langur perched on the steering wheel. The bus driver has been suspended for endangering the lives of the passengers. pic.twitter.com/RexZAfKZdr
— ANI (@ANI) October 6, 2018
हे प्रकरण १ ऑक्टोबरचं आहे. मीडिया रिपोर्टसनुसार, देवनगरे डिव्हिजनच्या या बस ड्रायव्हरचं नाव प्रकाश सांगण्यात येतंय. KSRTC प्रशासनासमोर हे प्रकरण आल्यानंतर त्यांनी बेपर्वाईचा आरोप लावत त्यांनी बस ड्रायव्हरला निलंबित केलंय.
KSRTC च्या एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, हे वानर अनेकदा आपल्या शिक्षकासोबत या मार्गावरून प्रवास करतं... १ ऑक्टोबर रोजी हे वानर ड्रायव्हरजवळ जाऊन बसलं... काही प्रवाशांनी त्याला तिथून हटवण्याचा प्रयत्न केला... परंतु, ते हटलं नाही... त्यावेळी काही प्रवाशांनी त्याचा व्हिडिओ बनवत सोशल मीडियावर टाकला.