Leopard Hunting Video: बिबट्या हा मार्जर प्रजातीमधील सर्वात चपळ प्राण्यांपैकी एक. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये बिबट्याने मानवी वस्तीत प्रवेश केल्याच्या बातम्या वेळोवेळी समोर येत असतात. अनेकदा बिबटे रस्ता चुकून गावाशहरांमध्ये प्रवेश करतात. सामान्यपणे सिंह थेट शिकार करण्यास प्राधान्य देतात मात्र बिबटे किंवा मार्जर प्रजातीमधील प्राणी हे लपून शिकार करतात. बराच वेळ एका जागी बसून आपलं सावज टप्प्यात येण्याची ते वाट पाहत असतात. अनेकदा बिबटे हे रात्रीच शिकार करतात. मात्र सकाळी एखादं सावज टप्प्यात असेल तर ते शिकार केल्याशिवाय राहत नाही. जंगलातील सर्वात वेगवान शिकारी प्राण्यांमध्ये बिबट्याचा समावेस होते. अगदी झाडावर चढूनही बिबटे शिकार करु शकतात.
बिबट्याच्या शिकार कौशल्याची झलक दाखवणार असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. व्हिडीओमधील बिबट्या चक्क माकडांची शिकार करण्याचा प्रयत्न करत आहे. हा बिबट्या एका झाडावरुन दुसऱ्या झाडावर माकडांचा पाठलाग करताना उड्या मारताना दिसतोय. विशेष म्हणजे या बिबट्याने झडप टाकून माकडाला पकडण्याचा केला. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी बिबट्या हा खरोखरच चपळ प्राण्यांपैकी एक असल्याचं म्हटलं आहे.
भारतीय वनसेवा अधिकारी सुशांत नंदा (IFS Susanta Nanda) यांनी ट्वीटरवरुन ही क्लिप शेअर केली आहे. याच कारणामुळे बिबट्या हा सर्वात संधीसाधू प्राण्याबरोबरच एक उत्तम शिकारी म्हणून ओळखला जातो. व्हिडीओमध्ये या बिबट्याला शिकार करण्याची संधी असल्याचं दिसत. त्यानंतर तो पाठलाग सुरु करतो आणि थेट झाडावर चढतो. मात्र माकडं पुढे दुसऱ्या झाडावर उडी मारतात. मात्र बिबट्या त्यांचा पाठलाग सोडत नाही. बिबट्याला शिकार करण्यात यश आलं की नाही हे समजू शकलं नाही. मात्र शिकार करण्यासाठी बिबट्याने हवेत घेतलेली झेप ही व्हिडीओ पाहणाऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.
This is why Leopards are known as most opportunistic and versatile hunters pic.twitter.com/ZFjCOkukL9
— Susanta Nanda (@susantananda3) July 15, 2023
या व्हिडीओला दीड लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडीओला हजारोंच्या संख्येन लाइक्स आणि कमेंट्स मिळाल्या असून लोकांनी हा व्हिडीओ पाहून आश्चर्य व्यक्त केलं आहे. झाडांवर चढण्यासाठी आणि तिथेही शिकार करण्यासाठी या बिग कॅट फॅमेलीमधील प्राणी माहीर असतात असं एकाने म्हटलं आहे. तर अन्य एकाने बिबटे हे फार कुशल आणि चपळ असल्याचं या व्हिडीओमधून अधोरेखित होत असल्याचं म्हटलं आहे. बिबटेच अशाप्रकारे झाडांवर चढून शिकार करु शकतात. वाघ किंवा अन्य मोठ्या प्राण्यांना हे शक्य होत नाही असंही एकाने म्हटलं आहे. दुसऱ्या एका व्यक्तीने बिबट्या शिकार करण्यासाठी अगदी 50 फूटांपर्यंतच्या चढू शकतो, असं म्हटलंय. बिबट्यांना दुसऱ्यांनी केलेल्या शिकारीमधील मांस खाण्याऐवजी स्वत: शिकार करण्याची सवय असते असं एकाने सांगितलं.