मुंबई : LIC Special Revival Campaign: भारती लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ( Bharti Life Insurance Corporation) आपल्या LIC पॉलिसी धारकांसाठी एक विशेष संधी घेऊन आली आहे. काही कारणास्तव आणि हप्ता चुकलेल्याने बंद झालेली पॉलिसी पुन्हा सुरु करता येणार आहे. LICने तुमच्यासाठी खास नवी संधी उपलब्ध करुन दिली आहे. त्यामुळे तुम्ही बंद पडलेली आणि आपली जुनी पॉलिसी सुरु करु शकता.
LIC Special Revival Campaign अंतर्गत एलआयसीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, पॉलिसीधारकांना त्यांच्या शेवटच्या न भरलेल्या प्रीमियमच्या तारखेपासून पाच वर्षांच्या आत काही पॉलिसी पुन्हा सुरु केल्या जाऊ शकतात. यासाठी एलआयसीच्या काही निश्चित अटी आणि शर्ती लागू आहेत.
एलआयसीने (LIC) सांगितले की पॉलिसीधारकांसाठी ही मोहीम 23 ऑगस्ट 2021 ते 22 ऑक्टोबर 2021 पर्यंत चालणार आहे.
नियमानुसार, एलआयसी (LIC) पॉलिसी जी पॉलिसी प्रीमियम भरण्याच्या कालावधी दरम्यान बंद केली गेली आहे आणि पॉलिसी टर्म दरम्यानच्या आधीच बंद झाली असेल तर एलआयसीच्या नवीन योजने अंतर्गत पुन्हा सुरु होण्यास त्या पात्र आहेत.
या मोहिमेचा फायदा त्या पॉलिसीधारकांना होईल ज्यांच्या पॉलिसी काही कारणामुळे त्यांचे प्रीमियम (LIC Premium) न भरल्यामुळे बंद करण्यात झाल्या आहेत.
एलआयसी पॉलिसीधारकाने भरलेल्या एकूण प्रीमियमवर आधारित मुदत (Term Assurance) आश्वासन आणि उच्च जोखमीच्या योजनांव्यतिरिक्त इतर पॉलिसींमध्ये विलंब शुल्कामध्ये काही सवलत देण्यात येणार आहे.
एलआयसीने (LIC) सांगितले की, 1 लाख रुपयांपर्यंतच्या थकबाकीच्या प्रीमियमवर, पॉलिसीधारकाला विलंब शुल्कामध्ये 20 टक्क्यांपर्यंतची सवलत मिळेल, ज्याची कमाल मर्यादा 2,000 रुपये आहे. पॉलिसीधारकाला 1,00,001 ते 3 लाख रुपयांपर्यंतच्या थकीत प्रीमियमवर 25 टक्के विलंब शुल्क सवलत मिळेल, कमाल मर्यादा 2,500 रुपयांपर्यंत आहे.
रिलीझनुसार, 3 लाख रुपयांपेक्षा अधिक प्रीमियममुळे एलआयसीसाठी (LIC due Premium)30 टक्के सूट विलंब शुल्कासाठी उपलब्ध असेल, कमाल मर्यादा 3,000 रुपये आहे. एलआयसीने सांगितले की वैद्यकीय आवश्यकतांमध्ये कोणतीही शिथिलता येणार नाही. पात्र आरोग्य आणि सूक्ष्म विमा पॉलिसींमध्ये विलंब शुल्क माफी देखील उपलब्ध असेल.