नवी दिल्ली : कोरोनामुक्त भारत करण्यासाठी केंद्र सरकारने लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला. या लॉकडाऊन दरम्यान केवळ अत्यावश्यक सेवाच सुरु ठेवण्यात आल्या आहेत. त्यानंतर आज मध्यरात्री केंद्र सरकारने जारी केलेल्या निर्णयानुसार दुकानं उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. असे असले तरी शॉपिंग मॉल्सना परवानगी देण्यात आली नाही. तसेच दारुची दुकानं आणि सलूनला देखील परवानगी नाकारण्यात आली आहे. या दोन्हीमुळे कोरोना वाढू शकतो अशी भीती केंद्र सरकारला आहे. आजपासून काय सुरु राहणार ? काय बंद राहणार ? हे जाणून घेऊया..
शॉप एंड इस्टॅब्लिशमेंट एक्ट अंतर्गत येणारी स्थानिक दुकानं, पालिके अंतर्गत येणारी स्थानिक बाजारपेठ
महानगरपालिका आणि नगरपालिका हद्दीत शेजारील दुकाने, स्वतंत्र दुकान आणि निवासी संकुलांमधील दुकाने
महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या बाहेरील नोंदणीकृत बाजारपेठांमध्ये असलेली दुकाने फक्त ५० टक्के कर्मचार्यांसह आणि सामाजिक अंतर आणि मास्क परिधान या अटींवर खुली
स्थानिक सलून आणि पार्लरला शनिवारपासून काम करण्याची परवानगी
ग्रामीण आणि निम्न ग्रामीण भागातील सर्व बाजारपेठा
शहरी भागांमध्ये, अनावश्यक वस्तू आणि सेवा चालवण्यास परवानगी
ग्रामीण भागात विना-आवश्यक सेवा सर्व प्रकारच्या दुकानात विकल्या जाऊ शकतात.
सर्व लहान दुकानांना उघडण्याची परवानगी
पालिका हद्दीतील बाजारपेठ संकुल उघडण्यास परवानगी
महानगरपालिका आणि नगरपालिका हद्दीबाहेरील मल्टी-ब्रँड आणि सिंगल-ब्रँड, मॉलमधील दुकाने बंद
महानगरपालिका आणि नगरपालिका हद्दीतील मार्केट कॉम्प्लेक्स, मल्टी-ब्रँड आणि सिंगल-ब्रँड मॉलमधील दुकाने बंद
सिनेमा हॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्स, व्यायामशाळा, क्रीडा संकुल, जलतरण तलाव, करमणूक उद्याने, थिएटर, बार आणि सभागृह, असेंब्ली हॉल बंद
मोठी दुकाने आणि बाजारपेठा बंद