नवी दिल्ली : लोकसभेत खासदारांच्या अर्थसंकल्प सत्रावेळी आज गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी गृहमंत्री अमित शाह यांना मध्यस्ती करावी लागली. लोकसभेत आज राष्ट्रीय शोध संस्था (NIA) बिलावर चर्चा सुरु होती. भाजपाचे खासदार आणि मुंबईचे माजी पोलीस कमिशनर सत्यपाल सिंह या विषयावर बोलत होते. यावेळी एमआयएमचे नेता आणि खासदार असदुद्दीन ओवेसी मध्येच बोलत होते. सत्यपाल सिंह आणि लोकसभा स्पीकर यांनी त्यांना असे करण्यापासून रोखले. पण ओवेसी तरी देखील बोलतच राहीले.
यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे अचानक उभे राहीले आणि सत्यपाल सिंह यांचे भाषण लक्ष देऊन ऐकण्याचे आवाहन ओवेसींना केले. यावेळी ओवेसी मध्येच अमित शाह यांना अडवायला लागले. तुम्हाला ऐकून घ्यायची सवय लावावी लागेल असे अमित शहांनी ओवेसींना म्हटले. जेव्हा दुसरं कोणी बोलत तेव्हा तुम्ही ऐकून घेता पण सत्यपालजी बोलतात तेव्हा तुम्ही मध्येच बोलत राहता. तुम्हाला ऐकायची सवय लावाली लागेल, असे अमित शाह म्हणाले.
यानंतर ओवेसींनी शाहंवर निशाणा साधला. मला भीती वाटते अशा शब्दात ओवेसींनी उत्तर दिले. याला अमित शाह यांनी तात्काळ उत्तर दिले. जर तुमच्या मनातच भीती असेल तर त्याला आम्ही काय करणार ? असा प्रश्न त्यांनी केला. जेव्हा तुमची वेळ येईल तेव्हाच बोला, कोणाच्या बोलण्यात व्यत्यय आणू नका असे त्यांनी विरोधकांना सांगितले.