नवी दिल्ली : lok sabha results 2019 लोकसभा निवडणुकांचे निकाल हाती येण्यास दणक्यात सुरुवात होताच सर्व स्तरांतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला. त्यांच्या याच यशाबद्दल भाजपामधील ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यंनीही आपल्या पक्षाच्या या घवघवीत यशाबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. भाजपला या अभुतपूर्व यशाच्या वाटेवर नेणाऱ्या मोदींना त्यांनी मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या.
'एएनआय' या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार त्यांनी पक्षाच्या म्हणजेच भाजपाच्या अध्यक्षपदी असणाऱ्या अमित शाह आणि पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या परिश्रमांची दाद दिली आहे. त्यांच्या समर्पक वृत्तीचीही प्रशंसा केली आहे. भाजपचा मुख्य उद्देश आणि त्यांचा मूळ हेतू प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवल्याबद्दल त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
भारतासारख्या एका मोठ्या आणि तितक्याच वैविध्यपूर्ण देशात निवडणूक प्रक्रिया इतक्या सुरळीतपणे आणि यशस्वीरित्या पार पाडणं ही भावनाच अतिशय सुरेख असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं. इतकच नव्हे तर, त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांपासून ते या प्रक्रियेत सहभागी असणाऱ्या यंत्रणांच्या कामालाही दाद दिली. देशाच्या पुढील उज्वल भविष्यासाठी आशावादी दृष्टीकोन व्यक्त करत अडवाणी यांनी आपल्या सदिच्छा दिल्या.
L K Advani, BJP: It's such a wonderful feeling that in a country as large & diverse as India, electoral process has been so successfully completed & for that, my compliments to the electorate & all the agencies involved. May our great nation be blessed with a bright future ahead. https://t.co/cAX8plrlzr
— ANI (@ANI) May 23, 2019
लोकसभा निवडणुकांचे यंदाचे निकाल हे भाजपची साऱ्या देशात असणारी हवा प्रतित करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेचा या साऱ्यात फायदा झाल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. तर, याच लोकप्रियतेच्या बळावर भाजप आणि घटर पक्षांचा आघाडीसाठीता बहुमताचा आकडा ३५० जागांपासून अवघं काही पावलं दूर आहे. त्यामुळे एकंदरच काँग्रेसला देशात सत्ता टिकवून ठेवण्यात सपशेल अपयश आल्याचं स्पष्ट होत आहे अशीच प्रतिक्रिया तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.