Old Pension Schemes : जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून कर्मचारी संघटनांची मागणी आहे. मात्र त्याबाबत अजूनही कोणताच तोडगा निघालेला नाही. काही अपवाद वगळता अजूनही प्रत्येक राज्यात नवी पेन्शन योजनाच सुरु आहे. केंद्र सरकार भविष्यात कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना (Old Pension Shheme) लागू करणार का, या प्रश्नावर सरकारने लोकसभेत (Lok Sabha) उत्तर दिलंय. सरकारकडे जुनी पेन्शन योजना सुरु करण्याबाबत कोणताही प्रस्ताव विचाराधीन नसल्याचं उत्तर केंद्रीय अर्थमंत्री भागवतराव कराड यांनी दिलंय. जुनी पेन्शन योजनेत कर्मचाऱ्यांना निर्धारित पेन्शन मिळते. निवृत्तीवेतनाचा आकडा हा कर्मचाऱ्याच्या शेवटच्या पगाराचा एकूण 50 टक्के रक्कमेइतका असतो. नवी पेन्शन योजनाही 2004 नंतर लागू करण्यात आली आहे. या नव्या पेन्शन योजनेत कर्मचाऱ्यांना त्यांच्या कॉन्ट्रीब्यूशननुसार पेन्शन मिळते. (lok sabha winter session 2022 finance state minister bhagwatrao karad on ops old pension scheme)
"राजस्थान, छत्तीसगढ आणि झारखंडमध्ये जुनी पेन्शन योजना पु्न्हा लागू करण्यात आली आहे. याबाबत या तिन्ही राज्य सरकारने केंद्र सरकार आणि पेन्शन फंड रेगुलेटरी एन्ड डेव्हलपमेंट अथॉरिटीला सांगण्यात आलंय. पंजाब सरकारनेही 18 नोव्हेंबर 2022 रोजी राज्य कर्मचाऱ्यांसाठी अधिसूचना जारी केली, त्यानुसार एनपीएस ओपीसमध्ये शिफ्ट करण्यात आलं", अशी माहिती भागवतराव कराड यांनी लेखीस्वरुपात दिली.
"राजस्थान, छत्तीसगढ आणि झारखंडच्या राज्य सरकारने केंद्र सरकारला आणि पीएफआरडीएला प्रस्ताव पाठवला आहे. एनपीएसनुसार कर्मचाऱ्यांचं कॉन्ट्रीब्यूशन हे राज्य सरकारला परत पाठवावं, असं या प्रस्तावात म्हटलं आहे. मात्र पंजाब सरकारकडून असा कोणताही प्रस्ताव प्राप्त झालेला नाही", अशी माहिती कराड यांनी लोकसभेत लेखी स्वरुपातील उत्तराद्वारे दिली.
दरम्यान पीएफआरडीएने या राज्य सरकारच्या प्रस्तावाला उत्तर दिलं. त्यानुसार पीएफआरडीए एक्ट 2013 मध्ये अशी कोणतीही तरतूद नाही, ज्यानुसार एनपीएससाठी सरकारकडील जमा राशी ही पुन्हा राज्य सरकारकडे ट्रान्सफर केली जाईल.
केंद्र सरकारने 2004 मध्ये नवी पेन्शन योजना सुरु केली होती. यानुसार या नव्या पेन्शनच्या फंडसाठी स्वतंत्र खाती उघडण्यात आली होती. तसेच फंडच्या गुंतवणूकीसाठी फंड मॅनेजरची नियुक्ती करण्यात आली होती. जर पेन्शन फंडच्या गुंतवणूकीचा परतावा चांगला असेल, तर पीएफ आणि जुनी पेन्शन स्कीमच्या तुलनेत नव्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या वेळेस चांगली रक्कम मिळू शकते. मात्र कर्मचाऱ्यांचं मत दुसरचं आहे. पेन्शन फंड गुंतवणूकीचा परतावा चांगलाच असेल, याची खात्री नाही. यासाठी कर्मचाऱ्यांकडून 7 व्या वेतन आयोगानुसार जु्नी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी केली जात आहे.