नवी दिल्ली : ही बातमी एका भेटीची आणि एका आशीर्वादाची... भाजपाच्या केंद्रीय कार्यकारिणीची दिल्लीमध्ये बैठक झाली. सोमवारी नागपुरात उमेदवारी अर्ज भरल्यानंतर नितीन गडकरी दिल्लीमध्ये बैठकीसाठी पोहोचले. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराजही त्याचवेळी तिथं पोहोचल्या. गडकरींनी खाली वाकून सुषमा स्वराज यांचे आशीर्वाद घेतले. सुषमा स्वराजांनीही कौतुकानं गडकरींना पाठीवर हात ठेवून आणि डोक्यावर हात ठेवून गडकरींना मनापासून आशीर्वाद दिले.
यावेळी सुषमा स्वराज लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत... पण त्यांनी मनःपूर्वक गडकरींना लोकसभा निवडणुकीसाठी आशीर्वाद दिले.
#WATCH Delhi: Visuals of External Affairs Minister Sushma Swaraj and Union Minister Nitin Gadkari from outside the BJP headquarters. The leaders had arrived for the party's CEC meeting. pic.twitter.com/7NMXtsH0af
— ANI (@ANI) March 25, 2019
यापूर्वी 'पंतप्रधान बनण्याची ना माझी इच्छा आहे ना आरएसएसची अशी काही योजना आहे' असं सांगत पंतप्रधानपदाच्या चर्चांणा त्यांनी उडवून लावलंय. निवडणुकीनंतर सरकार बनवण्यासाठी इतर राजकीय पक्षांच्या समर्थनाची गरज भासल्यास पंतप्रधान पदासाठी नितीन गडकरी यांचं नाव पुढे येऊ शकतं, अशी दाट शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जातेय.