स्वयंपाकाच्या गॅसवर सिलेंडरवर 800 रुपयांची सूट, ऑफर 31 मेपर्यंत !

स्वयंपाकाच्या सिलेंडरवर 800 रुपयांपर्यंतची मोठी सूट

Updated: May 6, 2021, 09:51 AM IST
स्वयंपाकाच्या गॅसवर सिलेंडरवर 800 रुपयांची सूट, ऑफर 31 मेपर्यंत ! title=

नवी दिल्ली : या महिन्यात सलग तिसर्‍या दिवशी पेट्रोल-डिझेल महाग झाले आहे. एलपीजी देखील प्रति सिलेंडर 809 रुपये आहे. पेट्रोल डिझेलच्या किंमतींवर तुम्हाला सूट मिळू शकत नाही कारण ते तेल कंपन्यांच्या हाती आहे. पण LPG म्हणजेच स्वयंपाकाच्या सिलेंडरवर 800 रुपयांपर्यंतची मोठी सूट मिळू शकते. (LPG Booking Offer)कसे ते जाणून घेऊया.

एलपीजी सिलेंडरवर 800 रुपये सवलत!

पेटीएमने या महिन्यात एलपीजीच्या बुकिंग आणि पेमेंटसाठी आपल्या ग्राहकांना बम्पर ऑफर दिली आहे. या ऑफरअंतर्गत ग्राहकांना केवळ 9 रुपयांमध्ये 809 रुपयांचे गॅस सिलेंडर मिळू शकेल.

या कॅशबॅक ऑफरअंतर्गत पेटीएम एपमधून ग्राहक पहिल्यांदाच गॅस सिलेंडर बुक करत असल्यास त्याला 800 रुपयांपर्यंतचे कॅशबॅक मिळू शकते.

तुम्हालाही पेटीएमच्या या ऑफरचा फायदा घ्यायचा असेल तर 31 मे 2021 पर्यंत संधी आहे. जे ग्राहक पहिल्यांदाच पेटीएमच्या माध्यमातून एलपीजी सिलिंडर बुक करुन पेमेंट करतील अशा ग्राहकांसाठी ही ऑफर आहे. जेव्हा आपण एलपीजी सिलिंडर बुक कराल आणि पेमेंट कराल तेव्हा ऑफर अंतर्गत एक स्क्रॅच कार्ड मिळेल, ज्यात 800 रुपयांपर्यंत कॅशबॅक असेल.

पहिल्या एलपीजी सिलेंडरच्या बुकिंगवर ही ऑफर आपोआप लागू होईल. ही ऑफर फक्त 500 रुपयांच्या किमान पेमेंटवर लागू होईल. कॅशबॅकसाठी, आपल्याला स्क्रॅच कार्ड उघडावे लागेल. जे आपल्याला बिल पेमेंटनंतर मिळेल. कॅशबॅकची रक्कम 10 ते 800 रुपयांपर्यंत असू शकते. आपल्याला हे स्क्रॅच कार्ड 7 दिवसांच्या आत उघडावे लागेल. त्यानंतर तुम्ही हे वापरु शकत नाही.

या ऑफरचा घेण्यासाठी आपल्या मोबाइल फोनमध्ये पेटीएम एप (Paytm App) डाउनलोड करावा लागेल. यानंतर आपल्या गॅस एजन्सीचे सिलेंडर बुकिंग करावे लागेल. त्यासाठी पेटीएम अ‍ॅपमध्ये Show more वर जा आणि Recharge and Pay Bills वर क्लिक करा.

यानंतर, आपल्याला सिलेंडर बुक करण्याचा पर्याय दिसेल. येथे, आपला गॅस प्रोवाईडर निवडा. बुकिंग करण्यापूर्वी, आपल्याला FIRSTLPG हा प्रोमो कोड टाकावा लागेल. बुकिंगच्या 24 तासांच्या आत तुम्हाला कॅशबॅक स्क्रॅच कार्ड मिळेल. हे स्क्रॅच कार्ड 7 दिवसांच्या आत वापरावे लागेल.