Haridwar Shelf Cloud Video: देवभूमी उत्तराखंडमध्ये गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पाऊस (Uttarakhand heavy Rainfall) उत्तराखंडमध्ये आपत्ती बनत असल्याचं दिसून येतंय. डेहराडूनमध्ये सोमवारी रात्रीपासून पाऊस पडतोय. नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्यानं नजीकच्या वसाहतींना धोका निर्माण झाला आहे. तर डोंगराळ भागात भूस्खलनाच्या घटना घडत असल्याची माहिती देखील समोर आली आहे. अशातच आता हरिद्वारमधील (Haridwar Shocking Video) एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.
हवामान खात्याने (IMD) उत्तराखंडमध्ये अतिवृष्टीसाठी रेड अलर्ट (Red Alert) जारी केला आहे. राज्यातील विविध भागात पाणी साचल्याने नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावं लागतंय. अशातच व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये निसर्गाची किमया दिसून येत आहे. या व्हिडिओमध्ये दोन ढग एकमेकांवर आदळत (Shelf Cloud) असल्याचे दिसत आहे. यामध्ये दोन ढगांमध्ये एक रेषा दिसतीये. हे दृश्य बर्फाळ पर्वतांवर हिमस्खलनासारखे दिसून येतंय. भयानक दृष्यपाहून अनेकांच्या मनात धडकी भरली आणि पळापळ सुरू केली.
आणखी वाचा - ती होती कोण? किम कार्दशियन एकटी असताना सेल्फीत कैद झाली रहस्यमय सावली; उडाली खळबळ!
व्हिडिओमध्ये दिसतंय की, काळे ढग हळूहळू (Massive shelf cloud) पुढे सरकत आहे आणि लोकं इकडे-तिकडे वेगाने धावत असल्याचं दिसतंय. मात्र, काही वेळाने ढग गायब झाल्याचं दिसून आलं. त्या क्षेत्रात मुसळधार पावसाने हजेरी लावली. अनेकांनी धाडस करून मोबाईल काढला आणि डोळ्याच्या समोर होणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद करण्याचा प्रयत्न केला.
Massive shelf cloud appears in Haridwar, Uttarakhand. pic.twitter.com/vl7lU5yFjf
— Anshul Saxena (@AskAnshul) July 11, 2023
दरम्यान, उत्तराखंडच्या नैनिताल, चंपावत, उधम सिंहनगरमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. डोंगराळ आणि सपाट भागात अतिवृष्टीमुळे हरिद्वारमध्ये गंगा नदीला पूर आल्याचं दिसून येतंय. धोक्याची पातळी वाढत असल्याने प्रशासन अलर्ट मोडवर आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं असल्याने डेंग्यू मलेरिया यांसारखे आजार बळवण्याची शक्यता आहे.
जेव्हा थंड हवा खाली उतरते आणि वादळाच्या पुढे पसरते, उबदार आणि ओलसर हवा वर उचलते तेव्हा शेल्फ क्लाउड तयार होतो. या उचलण्याच्या प्रक्रियेमुळे संक्षेपण आणि दृश्यमान ढग तयार होतात. निसर्गाचं हे वैशिष्ट्यपूर्ण प्रारूप आहे. डूम्स डे शेल्फ ढग त्यांच्या नाट्यमय स्वरूपामध्ये योगदान देणारी अनेक भिन्न वैशिष्ट्ये दाखवतात.