अलवर : आपण अनेकदा नेत्यांना मागून नावे ठेवतो. राज्यकर्त्यांना शिव्यांची लाखोली वाहतो. मात्र समोर असे बोलायला सहसा कोणी धजावणार नाही. असाच काहीसा प्रकार झाला.
राजस्थानचे कॅबिनेट मंत्री हेम सिंग भडाना यांच्या मुलाने आणि मित्रांनी मिळून एका व्यक्तीला बेदम मारहाण केली. ती व्यक्ती अत्यंत गंभीर असून तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
या संबंधित पीडीत व्यक्तीच्या वडीलांनी सांगितले की, काही अज्ञात लोक मंत्र्याबद्दल अपशब्द वापरत होते. त्यावेळेस त्यांचा मुलगा देखील तिथेच उभा होता. मंत्र्याच्या मुलाने या लोकांचे बोलणे ऐकले आणि भडकला. ते पाहून इतर लोक पळाले. मात्र त्यांचा मुलाला त्यांनी पकडले आणि त्याला बेदम मारहाण केली. आम्ही सोडवायला गेल्यावर आम्हाला देखील धमकवण्यात आले.
Rajasthan: Man allegedly held captive and beaten up by state Cabinet Minister Hem Singh Bhadana's son & his friends in Alwar yesterday, admitted in hospital under critical condition. pic.twitter.com/AhG7EKZEZQ
— ANI (@ANI) December 21, 2017
Some unidentified people verbally abused the Minister, my son was standing there while this happened. Those people fled but he was caught. He was later held captive & beaten up. We had to go to get him freed. We were also threatened: Father of the man beaten up pic.twitter.com/ApwJVx7Pbk
— ANI (@ANI) December 21, 2017
या सर्व प्रकारावर स्थानिक पोलीसांनी मौन पाळणे पसंत केले आहे. या घटनेची एफआयआर दाखल झाल्यानंतर त्यावर कायदेशीर प्रक्रिया सुरू केली जाईल.