Crime News In Marathi: नात्याला काळिमा फासणारी घटना राजस्थानच्या अलवरमध्ये घडली आहे. लग्नानंतर नवविवाहितेची संसाराबाबतीत अनेक स्वप्ने असतात. मात्र सुखी संसाराची स्वप्न रंगवत सासरी आलेल्या एका अल्पवयीन मुलीसोबत तिच्याच पतीने मोठा विश्वासघात केला आहे. सासरी पोहोचतान अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार करण्यात आले. लग्नाच्या पहिल्याच रात्री नवविवाहितेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. मोठा दीर, नणंदेचा नवरा आणि पतीनेमिळून तिच्यावर रात्रभर अत्याचार केला. अल्पवयीन मुलीने रामगढ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर हे प्रकरण समोर आले आहे.
17 वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे मागील महिन्यात 11 जून रोजी निकाह झाला होता. मुकीम खान यांच्यासोबत तिचे लग्न झाले होते. निकाहानंतर ती सासरी आली. मात्र सासरी येताच तिला एका खोलीत नेण्यात आले. घरातील तीन महिला ती येताच खोलीतून बाहेर निघून गेल्या. त्यानंतर तिच्या खोलीत तिचे सासरे आले. त्यामुळं ती थोडीशी घाबरली. सून ज्या ठिकाणी बसली होती तिथे ते आले व तिच्या खांद्यावर हात ठेवत अश्लील कृत्ये करण्यास सुरुवात केली.
अल्पवयीन मुलीने याचा विरोध करताच ते बाहेर निघून गेले. तेव्हा पीडितेने सुटकेचा निश्वास टाकला. मात्र, काही वेळातच सासरच्या मंडळींनी तिच्यासोबत भयंकर प्रकार केला. सासरे खोलीतून बाहेर जाताच आतमध्ये नणंदेचा नवरा सलीम खान, मोठा दीर मुफीद आणि पती मुकीम खोलीत आले. त्यानंतर तिघांनी मिळून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केला. इतकंच, नव्हे तर दुसऱ्या दिवशीही असाच प्रकार घडला.
सलग दोन दिवस पीडितेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. यामुळं तिची तब्येत बिघडली व ती बेशुद्ध झाली. पीडितेची अवस्था पाहून तिच्या घरच्यांनी घरात तिच्यावर उपचार करण्याचे ठरवले. मात्र तरीही तिच्या तब्येतीत कोणतीही सुधारणा झाली नाही. त्यानंतर तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
रुग्णालयात उपचार केल्यानंतर काही दिवसांत पीडितेच्या प्रकृतीत सुधारणा झाली. त्यानंतर तिच्यावर झालेल्या सामूहित अत्याचाराबाबत तिने तिच्या कुटुंबीयांना सांगितले. लग्नाच्या पहिल्याच रात्री आपल्या पोटच्या लेकीवर आलेल्या प्रसंगाने कुटुंबीय हादरले आहेत. मुलीच्या वडिलांनी अल्पवयीन मुलीला पोलिस ठाण्यात नेले व तिथे जाऊन तिच्या सासरच्यांविरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणात पोलिसांनी सामूहिक बलात्काराचा पॉक्सो कायद्याअंतर्गंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व प्रकरणात पोलीस अधिक तपास करत आहेत.