Mission Islam 2047 : देशातच एक प्रचंड मोठा कट शिजतोय, ज्याचा तुम्ही विचारही केला नसेल. हा कट आहे भारताला 2047 पर्यंत मुस्लीम राष्ट्र बनवण्याचा. त्यासाठी देशातल्या काही कोपऱ्यांमध्ये ट्रेनिंगही सुरू झालंय. या कटाचा पर्दाफाश झाला तो बिहारमधल्या पटनामध्ये.
इथे चक्क मिशन इस्लाम 2047 साठी ट्रेनिंग सेंटर सुरू होतं. त्यामध्ये मुस्लिम तरुणांना हिंसा पेटवण्याचं, धार्मिक तेढ पसरवण्याचं आणि हत्यारं चालवण्याचं ट्रेनिंग दिलं जात होतं. पोलिसांनी हा कट उधळला, त्यावेळी पोलिसांच्या हाती या 'मिशन इस्लाम 2047' ची खळबळजनक कागदपत्रं हाती लागली
काय आहे मिशन इस्लाम 2047?
भारतामध्ये बंदी असलेल्या इस्लामिक संघटनांनी मिशन इस्लाम 2047 हा प्लॅन आखलाय, त्यासाठी देशातल्या कट्टर मुस्लीम तरुणांचा शोध सुरू झालाय. अशा तरुणांना दहशतवादी कारवायांचं ट्रेनिंग दिलं जाणार आहे. बिहारमधल्या या ट्रेनिंग कॅम्पमध्ये केरळ, झारखंड, तमिळनाडू आणि पश्चिम बंगालमधल्या तरुणांनाही ट्रेनिंग दिलं जात होतं. या 'मिशन इस्लाम 2047'साठी पाकिस्तान आणि तुर्कस्तानातून मदत मिळतेय.
पटनामधल्या फुलवारी भागातून याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आलीय. या प्रकरणातल्या जलालुद्दीन आणि परवेजचा पोलीस शोध घेतायत.. यातला जलालुद्दीन तर झारखंडमध्ये पोलीस उपनिरीक्षक होता. मिशन इस्लाम 2047 नं पोलिसांचीही झोप उडवलीय. आता देशाच्या कानाकोपऱ्यात कुठे कुठे या मिशनसाठी कारवाया सुरू झाल्यायत, याचा डोळ्यांत तेल घालून शोध घ्यावा लागणार आहे.