गेम खेळताना मोबाईलचा स्फोट, तुम्हीसुद्धा 'या' चुका करत असाल तर वेळीच व्हा सावध!

13 वर्षाचा मुलगा रूममध्ये खेळत होता फोनवर गेम खेळत होता, अन् झाला मोठा आवाज

Updated: Dec 13, 2022, 08:23 PM IST
गेम खेळताना मोबाईलचा स्फोट, तुम्हीसुद्धा 'या' चुका करत असाल तर वेळीच व्हा सावध! title=

Smartphone Blast News: आताची लहान मुलं ही खूप स्मार्ट झाली आहेत. कमी मोठ्यांपेक्षाही ते चांगल्या पद्धतीने फोन हाताळताना दिसतात. मात्र मोबाईल जेवढा चांगला आहे तितकाच आरोग्यासाठी धोकादायक आहे. मोबाईलच्या अतिवापरामुळे अनेकवेळा स्मार्टफोनचा स्फोट झाल्याच्या अनेक घटना आपण पाहिल्या असतील. अशातच उत्तर प्रदेशमधील मथुरा येथील व्हिडीओ गेम खेळत असताना स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 

13 वर्षाचा मुलगा रेड मी फोनवर गेम खेळत होता, अचानक त्याच्या खोलीमध्ये मोठा आवाज झाला. आवाज ऐकून घरातील सर्व लोक खोलीच्या दिशेने पळाले. खोलीमध्ये पाहिल्यावर, गेम खेळणारा चिमुकला जखमी झाला होता. त्याचा चेहरा आणि हात यामध्ये भाजला गेला असून रूग्णालयात त्याच्यावर उपचार चालू आहेत. 

मोबाईलचा स्फोट होण्याची ही पहिलीच घटना नाही. याआधीही फोनचा स्फोट झाल्याची प्रकरणं समोर आली होतीत. नेमका कशामुळे होतो फोनचा स्फोट? काहीवेळा यूजर चुकीच्या पद्धतीने फोन वापरतात. तर काहीवेळा बनवणाऱ्या कंपनीची चूक असल्यानेही स्फोट होऊ शकतो. 

मोबाईल फोन चार्ज करताना तो वापरणं टाळा. कारण अनेकजण चार्जिंग लावून फोनवर सिनेमा पाहतात किंवा गेम खेळतात. मात्र हे करणं त्यांच्या जिवावर बेतू शकतं. 

फोन चार्ज करण्यासाठी मुख्य चार्जर वापरा, डुबलीकेट चार्जरमुळे फोन गरम होतो आणि स्फोट होण्याचा धोका वाढतो. त्यासोबतच तुमच्या फोनमधील मेमरी 70-80 रिकामी ठेवा. असं केल्याने तुमचा फोनसुद्धा व्यवस्थित चालेल आणि स्फोट होण्याचाही काही धोका नसतो.