MRVC Recruitment: मुंबईत चांगल्या पगाराची नोकरी शोधत असलेल्या तरुणांसाठी महत्वाची अपडेट आहे. मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये विविध पदांची भरती केली जात आहे. थेट मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिरकेशन जाहीर करण्यात आले आहे. पदासाठी लागणारी पात्रता, वयोमर्यादा, पगार, मुलाखतीची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये प्रकल्प अभियंता (Project Engineer) ची एकूण 20 पदे भरली जाणार आहेत. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून किमान 60% गुणांसह स्थापत्य अभियांत्रिकी पदवी असणे आवश्यक आहे. यासोबतच उमेदवारांना संबंधित कामाचा 2 वर्षे अनुभव असणे गरजेचे आहे.
प्रोजेक्ट इंजिनीअर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 22 ऑगस्ट 2023 रोजी 30 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे. एससी/एसटी उमेदवारांना वयामध्ये 5 वर्षांची सवलत देण्यात येणार आहे तर ओबीसी उमेदवारांना 3 वर्षाची सवलत दिली जाईल. अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क घेण्यात येणार नाही.
प्रोजेक्ट इंजिनीअर पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 40 हजार ते 1 लाख 40 हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाईल. उमेदवारांना मुंबईत नोकरी करण्याची संधी मिळणार आहे.
प्रोजेक्ट इंजिनीअर पदासाठी कोणतीही लेखी परीक्षा होणार नसून थेट मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाणार आहे. 25 ते 29 सप्टेंबर 2023 या दरम्यान उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत.
मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड, दुसरा माळा, चर्चगेट स्थानक इमारत, चर्चगेट, मुंबई- 400020 या पत्त्यावर उमेदवारांना उपस्थित राहावे लागणार आहे. मुलाखतीसाठी येताना नोकरीसाठी लागणारी कागदपत्रे उमेदवारांनी सोबत बाळगावीत. दिलेल्या तारखेच्यानंतर मुलाखत घेतली जाणार नाही,याची नोंद घ्या.
एमपीएससी अंतर्गत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब च्या एकूण 823 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये दुय्यम निबंधक (श्रेणी-1)/मुद्रांक निरीक्षक (गट-ब) च्या 78 जागा, राज्य कर निरीक्षक (गट-ब) च्या 93 जागा, सहाय्यक कक्ष अधिकारी (गट-ब) च्या 49 जागा आणि पोलीस उपनिरीक्षक (गट-ब) च्या 603 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदासांठी अर्ज करणारे उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून पदवीधर असणे आवश्यक आहे.
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 ऑक्टोबर 2022 रोजी18 ते 38 वर्षांदरम्यान असणे आवश्यक आहे.मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ उमेदवारांना यामध्ये 5 वर्षांची सवलत देण्यात येणार आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकडून 544 रुपये अर्ज शुल्क आकारण्यात येईल. तर मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग उमेदवारांकडून 344 रुपये अर्ज शुल्क आकारले जाईल. ही परीक्षा अमरावती, छ.संभाजीनगर , नागपूर, नाशिक, मुंबई आणि पुणे येथील परीक्षा केंद्रावर घेतली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 1 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे.