बद्रीनाथ-केदारनाथ धामसाठी मुकेश अंबानींनी उघडला पेठारा, दर्शनानंतर दिलं 'इतक्या' कोटींचं दान

Mukesh Ambani Darshan Badrinath and Kedarnath:  मुकेश अंबानी यांनी देशाची समृद्धी, शांती आणि आनंदासाठी भगवान बद्रीनाथाकडे प्रार्थना केली.

Pravin Dabholkar | Updated: Oct 21, 2024, 03:58 PM IST
बद्रीनाथ-केदारनाथ धामसाठी मुकेश अंबानींनी उघडला पेठारा, दर्शनानंतर दिलं 'इतक्या' कोटींचं दान title=
मुकेश अंबानी

Mukesh Ambani Darshan Badrinath and Kedarnath: रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि संचालक भारताचे प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांनी उत्तराखंड येथील दोन प्रमुख तीर्थस्थळांना मुकेश अंबानी यांनी भेट दिली. बद्रीनाथ धाम आणि केदारनाथ धामच्या दर्शनासाठी अंबानी गेले होते. या धार्मिक यात्रेदरम्यान त्यांनी दोन्ही धामांना भरभरुन दानं दिलं. मुकेश अंबानी यांनी श्री बद्रीनाथ धाम येथून आपल्या धाम यात्रेला सुरुवात केली. ते आज सकाळी श्री बद्रीनाथ मंदिरात पोहोचले. तेथे मंदिरातील पुजारी आणि भक्तांनी त्यांचे प्रेमाने स्वागत केले. श्री बद्रीनाथ धाम हे भगवान विष्णूंचे निवासस्थान मानले जाते. हे देशातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. हे धाम उत्तराखंडच्या चार धाम यात्रेचा एक महत्त्वाचा भाग आहे. बद्रीनाथ धामला दरवर्षी लाखो भाविक भेट देतात. मुकेश अंबानी यांनी देशाची समृद्धी, शांती आणि आनंदासाठी भगवान बद्रीनाथाकडे प्रार्थना केली.

केदारनाथ धामचे दर्शन

बद्रीनाथ धामला भेट दिल्यानंतर मुकेश अंबानींनी केदारनाथ धामची यात्रा केली. केदारनाथ धाम हे भगवान शिवाचे प्रमुख तीर्थक्षेत्र आहे आणि उत्तराखंडच्या चार धामांपैकी एक आहे. हे धाम हिमालयाच्या उंचीवर वसलेले आहे. धार्मिक स्थळासोबतच नैसर्गिक सौंदर्यासाठी हे ठीकाण प्रसिद्ध आहे. मुकेश अंबानी यांनी येथे भगवान शिवाची पूजा केली.

बीकेटीसी अध्यक्षांनी केले  स्वागत

केदारनाथ धाम येथे बद्री-केदार मंदिर समितीचे (BKTC) अध्यक्ष अजेंद्र अजय यांनी मुकेश अंबानींचे स्वागत केले.मुकेश अंबानी यांच्या आगमनाने धामचे महत्त्व आणखी वाढले आहे. आपल्या कुटुंबाच्या वतीने अंबानी यांनी दोन्ही मंदिरांना 5 कोटी रुपयांची देणगी दिल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. ज्याचा उपयोग मंदिरांच्या विकासासाठी आणि त्यांच्या सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी केला जाणार असल्याचे ते म्हणाले. दोन्ही तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे वर्णन करत त्यांनी अंबानींच्या दानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

यात्रेकरूंसाठी अंबानींचा खास संदेश 

भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि धार्मिक श्रद्धा हीच देशाची खरी ताकद आहे. बद्रीनाथ आणि केदारनाथ सारखी धाम ही केवळ धार्मिक स्थळे नाहीत तर भारतीय संस्कृती आणि परंपरेचे प्रतीक आहेत, असे मुकेश अंबानी म्हणाले. या तीर्थक्षेत्रांचे पावित्र्य राखण्यासाठी सर्व भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

मंदिरांच्या विकास योजनांवर केला जाणार खर्च 

मुकेश अंबानी यांनी दिलेल्या 5 कोटींची रक्कम मंदिरांच्या विकास योजनांवर खर्च करण्यात येणार आहे. यामध्ये धामची पुनर्बांधणी, यात्रेकरूंच्या सुविधांमध्ये सुधारणा, सुरक्षा व्यवस्था आणि धामची स्वच्छता राखणे आदी कामांचा समावेश असेल. या दोन्ही धामांना देशासह जगभरातून लाखो भाविक वर्षभरात भेट देतात. या देणगीमुळे यात्रेकरूंना चांगल्या सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.या देणगीमुळे धमांचा विकास होणार असला, तरी अंबानींच्या धार्मिक श्रद्धेचे उदाहरणही या दानातून समोर आले आहे. मुकेश अंबानींच्या या धार्मिक भेटीमुळे उत्तराखंडच्या तीर्थक्षेत्रांचे महत्त्व पुन्हा एकदा राष्ट्रीय चर्चेत आले आहे. त्यांनी दिलेल्या देणगीमुळे धामच्या विकासासाठी नवी ऊर्जा मिळेल.