मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी हे आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. सर्वाधिक श्रीमंत असल्यामुळे मुकेश अंबानींना सुरक्षाही तशाच प्रकारची पुरवण्यात आली आहे. कमांडोंपासून बाऊंन्सरपर्यंत मुकेश अंबानीना सुरक्षा पुरवतात. सुरक्षेसाठी मुकेश अंबानी महिन्याला 20 लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च करतात. मुकेश अंबानी जेव्हा घरातून बाहेर पडतात तेव्हा जवळपास दोन डझन सुरक्षा रक्षक त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असतात. मुकेश अंबानींना सरकार झेड दर्जाची सुरक्षा देते. भारतातल्या कोणत्याही व्यक्तीला मिळणारी ही तिसऱ्या क्रमांकाची सुरक्षा आहे. झेड दर्जामध्ये एकूण 22 सुरक्षारक्षक असतात.
फेसबूकचा प्रमुख मार्क झुकरबर्ग याच्या सुरक्षेचा खर्च एका देशाच्या राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या सुरक्षेपेक्षाही जास्त आहे. 2017 साली झुकरबर्गनं सुरक्षेसाठी जवळपास 5 हजार कोटी रुपये खर्च केले. हा खर्च 2016 सालापेक्षा 50 टक्के जास्त आहे. 2016मध्ये झुकरबर्गनं 3.2 कोटी रुपये खर्च केले होते. सुरक्षेसाठी झुकरबर्ग दिवसाला 1.30 कोटी रुपये खर्च करतो.
फोर्ब्सनं दिलेल्या आकडेवारीनुसार ई-कॉमर्स वेबसाईट अॅमेझॉनचे संस्थापक आणि मालक जेफ बेजोस हे जगातले सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहेत. जेफ बेजोस सुरक्षेसाठी एका वर्षाला 10 कोटी रुपये म्हणजेच दिवसाला जवळपास 2.84 लाख रुपये खर्च करतात.
आयफोन आणि आयपॅड बनवणारी जगातली सगळ्यात मोठी टेक कंपनी ऍपल्लचे सीईओ टीम कूक आहेत. ऍपल्ल कंपनी त्यांच्या सुरक्षेवर वर्षाला 1,45,60,000 रुपये खर्च करते. हा खर्च दिवसाला 40 हजार रुपये एवढा होतो.
जगातला सर्वोत्तम गुंतवणूकदार आणि गुंतवणुकीचे सल्ले देणारा वॉरेन बफे त्यांच्या सुरक्षेवर वर्षाला 2,51,55,000 रुपये खर्च करतात. हा खर्च दिवसाला जवळपास 68 हजार रुपये एवढा होतो.