Nagaland Landslide Video : राष्ट्रीय महामार्गावरील एक भयानक घटनेच्या व्हिडीओने हृदयाचे ठोके चुकले आहे. तीन सेकंदात होत्याचं नव्हतं झालं. नागालँडमधील भूस्खलनाचा भयानक व्हिडीओने झोप उडवली आहे. दिमापूर जिल्ह्यातील चुमुकेदिमा या ठिकाणी मंगळवारी जोरदार पाऊस सुरु होता. त्यावेळी राष्ट्रीय महामार्गावर डोंगरावरुन तो महाकाय दगड आली खाली आणि रस्त्यावरील गाड्यांचा चकनाचूर झाल्या. दरळ कोसळल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग 29 वर या दुर्घटनेत 2 जणांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण गंभीर जखमी आहे.
डोंगराळ भागातून महामार्गावर पावसाळ्यात अशा अनेक घटना घडतात. या घटनेचा व्हिडीओ अतिशय भयानक आहे. राष्ट्रीय महामार्गावर उभ्या असलेल्या वाहनांवर अचानक काही सेकंदात दरळ कोसळली. काळा रंगाच्या कारवर तो येऊन आदळला. या घटना एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जो पाहून कोणीही विचलित होऊ शकतं. (nagaland landslide video 3 cars crushed by falling rock 2 people died viral trending video on google news today )
#WATCH | A massive rock smashed a car leaving two people dead and three seriously injured in Dimapur's Chumoukedima, Nagaland, earlier today
(Viral video confirmed by police) pic.twitter.com/0rVUYZLZFN
— ANI (@ANI) July 4, 2023
ही संपूर्ण घटना त्या दुर्घटनाग्रस्त गाड्यांच्या मागे असलेल्या एका गाडीच्या डॅशबोर्ड कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाली. हा व्हिडीओ पाहून अनेक जण हादरले आहेत. या दुघर्टनेत तीन गाड्या लक्ष झाल्यात.
दरम्यान नागालँड सीएम नेफियू रिओ यांनी ट्विट करुन शोक व्यक्त केला आहे. ते ट्विटवर म्हणाले की, ही घटना मंगळवारी सायंकाळी 5 वाजता दिमापूर आणि कोहिमा राष्ट्रीय महामार्गावर घडली आहे. या ठिकाणाला पाकाळा पहाड असं म्हटलं जातं. या ठिकाणी पावसाळ्यात दरड आणि खडक कोसळण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असतात.
Today, rockfall on the National Highway at around 5pm between Dimapur & Kohima caused serious damage including death to 2 persons & serious injury to 3 others. This place has always been known as “pakala pahar”; known for landslides & rockfalls. @nitin_gadkari @AmitShah @PMOIndia
— Neiphiu Rio (@Neiphiu_Rio) July 4, 2023
या दुर्घटनेत 2 जणांचा मृत्यू झाला तर 3 जण जखमी झाले आहेत. मृताच्या नातेवाईकांना प्रत्येकी 4 लाख आणि जखमींवर मोफत उपचार होणार आहे.