नवी दिल्ली : आज जगामधल्या बहुतांश देशांमध्ये सीमेवरून वाद सुरू आहेत. पण माणसांची अशीही एक वस्ती आहेत जिथे सीमारेषा असल्याचा काही फरक पडत नाही.
भारताच्या सीमारेषेवर ही वस्ती आहे. इथे राहणाऱ्या लोकांकडे दोन देशांचे नागरिकत्व आहे.
उत्तर पूर्व सीमेवरील नागालॅंड राज्यातील मोन जिल्ह्यात लोंगवा नावाचे गाव आहे. हे गाव आंतरराष्ट्री सीमा रेषेवरून भारत आणि म्यानमारमध्ये आहे.
लोंगवा गावातील नागरीकांकडे दोन्ही गावांचे नागरिकत्व आहे. म्हणजेच ते भारत आणि म्यानमारचेही नागरिक आहेत. इथल्या कुटुंबातील जेवण तर म्यानमारमध्ये बनते पण आराम करायला ते भारतामध्ये जातात.
गावप्रमुखाचा एक मुलगा म्यानमारच्या सैन्यात आहे. देशाच्या नावावरून इथे कधी तणाव दिसत नाही.
या गावातील लोक अतिशय सभ्य आणि शांतातप्रिय आहेत. संपूर्ण जगाला या गावामुळे शांततेचा संदेश मिळतोय.