नवी दिल्ली : राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने एक धक्कादायक भविष्यवाणी केली आहे. पूर, मुसळधार पाऊस आणि भूस्खलनबाबत प्राधिकरणाने भविष्यवाणी केली आहे. NDMA ने भविष्यवाणी केली आहे की, पुढच्या 10 वर्षात पूर आणि पावसामुळे जवळपास 16 हजार लोकांचा मृत्यू होणार आहे. तर 47000 कोटी पेक्षा जास्त संपत्तीचं नुकसान होईल. NDMA ने म्हटलं आहे की, भारताकडे प्रगत उपग्रह आणि पूर्व इशारा देणारी यंत्रणा आहे. ज्यामुळे यावर काही प्रमाणात नियंत्रण मिळवता येऊ शकतं.
गृह मंत्रालयाने देशातील 640 जिल्ह्यांमधील आपत्तीबाबत अभ्यास केला आहे. डीआरआरनुसार राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये एक नॅशनल रिजिल्यन्स इंडेक्स (एनआरआय) तयार करण्यात आलं आहे. ज्यामध्ये आपत्तीची तिव्रता, नुकसान, जीवाचा धोका याबाबत माहिती गोळा करण्यात आली आहे.
रिपोर्टनुसार 'अनेक राज्यांनी आतापर्यंत आपत्तीचं स्वरुप आणि त्यापासून संरक्षण कसं करावं याबाबत अजून कोणतीही तयारी केलेली नाही. राज्यांनी केलेली तयारी खूप साध्या पद्धतीची आहे.