NIA Raid : पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यालयांवर (PFI) गुरुवारी एनआयएने (NIA) देशभरात छापे टाकले. देशभरातल्या 10 राज्यात हे छापे (Raid) टाकण्यात आले. यामध्ये 100 हून अधिक जणांना अटक करण्यात आली. पुण्यातील (pune) कौसर बागेमध्येही कारवाई करत छापेमारी (NIA Raid) करण्यात आली. तपासानंतर केरळमधून (kerala) ताब्यात घेतलेल्या व्यक्तीकडून धक्कादायक माहिती समोर आलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची पाटण्यातील रॅली पीएएफआयच्या (PFI) निशाण्यावर होती अशी माहिती अटक करण्यात आलेल्या व्यक्तीनं दिलीय. यानंतर देशभरात एकच खळबळ उडाली आहे.
छापा टाकण्यापूर्वी, गुप्तचर संस्था आयबी (IB) आणि रॉ (RAW) ने पीएफायच्या कारवायांबद्दल महत्वाची माहिती गोळा केली होती, ज्यामध्ये त्यांच्या कॅडर आणि त्यांच्या नेत्यांशी संबंधित माहिती असलेला एक डॉजियर (Dossier) तयार करण्यात आला होता. छाप्यापूर्वी, पीएफआयचे डॉजियर राष्ट्रीय तपास संस्था (NIA) आणि अंमलबजावणी संचालनालय (ED) देण्यात आले होते. (NIA Raid on pfi Secret planning like surgical strike monitoring by nsa ajit doval)
झी मीडियाला मिळालेल्या विशेष माहितीनुसार, मध्यरात्री कारवाईपूर्वी दिल्लीत एक विशेष नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला होता. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल (nsa ajit doval) आणि आयबी प्रमुख तपन डेका यांनी संपूर्ण रात्र या नियंत्रण कक्षात कारवाईवर नजर ठेवली.
बैठकीत आखली रणनिती
राष्ट्रीय तपास संस्था (NIA), ईडी (ED) आणि काही राज्यांच्या पोलिसांमार्फत (Police) पीएफायवर (PFI) 93 ठिकाणी छापे टाकण्यात आले. यामध्ये एकूण 106 लोकांना अटक करण्यात आली. ऑगस्टमध्ये, गृहमंत्री अमित शाह यांनी पीएफायवर कारवाई करण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, आयबी (IB) प्रमुख तपन डेका आणि रॉ (RAW) प्रमुख सामंत गोयल यांच्यासोबत एक महत्त्वाची बैठक घेतली, ज्यामध्ये पीएफआयच्या देशविरोधी कारवायांची माहिती गोळा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
रात्रभर छापे
पीएफआयवर (PFI) सर्जिकल स्ट्राईक ( surgical strike) करण्यापूर्वी, गुप्तचर संस्थांच्या वेगवेगळ्या पथकांनी पीएफआयच्या प्रत्येक कॅडरची माहिती गोळा केली होती, ज्यामुळे देशाच्या सुरक्षेला धोका होता. राष्ट्रीय तपास संस्था (nia), ईडी (ed) पथकांच्या सुरक्षेला धोका असलेल्या ठिकाणांवरही पीएफआयच्या कार्यालयांवरही छापे टाकण्यात आले.
त्यामुळे या कारवाईचे नियोजन अशा प्रकारे करण्यात आले होते की, छापा टाकला जात असल्याचे सर्वांना कळेपर्यंत सर्व तपास यंत्रणा सुरक्षितपणे आपापल्या ठिकाणी परतले पाहिजेत. सकाळी आठ वाजेपर्यंत बहुतांश पथक आरोपींना घेऊन मुख्यालयात परतले.