नवी दिल्ली : काश्मीरमध्ये रमजानवेळी अतिरेक्यांविरोधात कारवाई केली जाणार नाही, मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्या मागणीला केंद्राने हिरवा कंदील दिला आहे. रमजानच्या काळात भारतीय लष्कर अतिरेक्यांविरोधात कोणतंही ऑपरेशन करणार नाही, असे आदेश केंद्रीय गृहमंत्रालयाने लष्कराला दिले आहेत. मात्र अतिरेक्यांनी कोणत्याही निष्पाप नागरिकांवर किंवा लष्करावर हल्ला चढवण्याचा प्रयत्न केल्यास चोख प्रत्युत्तर देण्यात येणार आहे. लष्कराने स्वत:हून कोणतंही ऑपरेशन अतिरेक्यांविरोधात, रमजानच्या महिन्यात करू नये, असे हे आदेश आहेत. मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी ही मागणी केंद्राकडे लावून धरली होती, अखेर केंद्राने या मागणीला मंजुरी दिली आहे.
काश्मीरमध्ये रमजानवेळी अतिरेक्यांविरोधात कारवाई केली जाणार नसल्याने, विरोधीपक्षाकडून भाजपवर टीका होण्याची दाट शक्यता आहे, खासकरून महाराष्ट्रात मित्रपक्ष शिवसेनेची यावर काय प्रतिक्रिया असेल, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.