नवी दिल्ली : SBI स्टेट बँक ऑफ इंडियाकडून खातेधारकांच्या दृष्टीनं अनेक नव्या योजना आणि सेवा पुरवल्या जातात. त्यातच आता बँकेकडून आणखी एक भर टाकण्यात आली आहे. ही भर म्हणण्यापेक्षा बँकेकडून खातेधारकांना दिली जाणारी खास भेटच ठरत आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही.
कारण, ठराविक सेवांसाठी स्टेट बँक ऑफ इंडिया यापुढं खातेधारकांकडून पैसे आकारणार नसल्याचं बँकेच्याच अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन सांगण्यात आलं. एसएमएस अलर्ट आणि किमान राशीसाठी बँक आकारत असणारे पैसे यापुढं आकारले जाणार नाहीत. शिवाय अनावश्यक ऍपमुळं होणारी डोकेदुखी कमी करण्यासाठी म्हणून खातेधारकांनी #YONOSBI ऍपचा वापर करावा, असंही सांगण्यात येत आहे.
खात्याशी संलग्न असणाऱ्या मोबाईल क्रमांकावर खात्यासंदर्भातील माहिती पाठवण्यासाठी बँकेकडून यापूर्वी ठराविक रक्कम आकारली जात होती. पण, यापुढं खातेधारकांना ही रक्कम देणं बंधनकारक नसेल.
SBI सेविंग खाता मतलब अद्भुत लाभ !
इस स्वतंत्रता दिवस सेविंग खातों में SMS अलर्ट और न्यूनतम बैलेंस चार्जेज से मुक्त हो जाइए |
अनावश्यक ऍप्स से छुटकारा पाने के लिए आज ही #YONOSBI डाउनलोड करे:
https://t.co/wWHot51u7y#HappyIndependenceDay #Freedom #SMSAlert #MinimumMonthlyBalance pic.twitter.com/8Z3wtu4CVy— State Bank of India (@TheOfficialSBI) August 15, 2020
किमान राशी खात्यात नसल्यासही आकारले जात होते पैसे
SBI मध्ये खातं असणाऱ्यांना किमान ३ हजार रुपये इतकी रक्कम खात्यात ठेवणं बंधनकारक होतं. असं न केल्यास त्या खातेधारकाकडून बँक पैसे आकारत असे. ही रक्कम ५० टक्क्यांहून कमी झाल्यास म्हणजेच बँकेला रकमेच्या स्वरुपात १० रुपये आणि जीएसटी द्यावा लागत होता. खात्यातील ठेव ७५ टक्क्यांहून कमी झाल्यास १५ रुपये आणि त्यावरील जीएसटी इतकी रक्कम खातेधारकानं देणं अपेक्षित होतं.