Oil India recruitment 2021 | ऑइल इंडियामध्ये 500 हून अधिक पदांसाठी भरती; सविस्तर वाचा

कारी क्षेत्रात काम करण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. ऑईल इंडिया लिमिटेड कंपनीत ग्रेड 3 पदांसाठी बंपर भरती होणार आहे.

Updated: Aug 28, 2021, 09:18 AM IST
Oil India recruitment 2021 | ऑइल इंडियामध्ये 500 हून अधिक पदांसाठी भरती; सविस्तर वाचा title=

नवी दिल्ली : सरकारी क्षेत्रात काम करण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. ऑईल इंडिया लिमिटेड कंपनीत ग्रेड 3 पदांसाठी बंपर भरती होणार आहे. 

24 ऑगस्ट ते 23 सप्टेंबरपर्यंत करता येईल ऑनलाईन अर्ज
535 पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यासाठी 24 ऑगस्टपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून. 24 ऑगस्ट ते 23 सप्टेंबर 2021 पर्यंत उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात.

कंपनीतर्फे जारी केलेल्या नोटिफिकेशनमध्ये म्हटले आहे की, ITIच्या पदांवर होणारी भरती आहे. ऑइल इंडियाच्या या पदांसाठी डिब्रुगड, तिनसुखिया, सिवासनगर, आसाम आणि अरुणाचल प्रदेशातील जिल्ह्यांसाठी ही भरती केली जाणार आहे.

पदे 
इलेक्ट्रिशियन ट्रेड- 38 पद
फिटर ट्रेड- 144 पद
मॅकेनिक मोटर व्हीकल- 42 पद
इलेक्ट्रॉनिक्स मॅकेनिक ट्रेड- 40 पद
टर्नर ट्रेड- 04 पद
ड्रॉफ्ट्समॅन सिविल ट्रेड- 08 पद
इंस्ट्रूमेंट मॅकेनिक ट्रेड- 81 पद
मशीनिस्ट ट्रेड- 13 पद
मॅकेनिक डीझेल ट्रेड- 97 पद

सामान्य कॅटगिरीमध्ये सामिल 18 ते 30 वर्षाचे उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. तर एसटी/एससी कॅटेगिरीतील 18 ते 35 वर्षे वय असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.