मुंबई : ऑप्टिकल इल्युजन हे खूपच मजेदार असते. हे असे काही फोटो किंवा व्हिडीओ असतात, जे आपल्या डोळ्यांना आणि मेंदूला विचार करायला भाग पाडतात. तसे पाहाता आपल्या मेंदूला रोजरोज तेच काम करण्याची सवय झाली असते, ज्यामुळे आपल्या मेंदूला थोडा चालना देण्याची गरज असते, ज्यामुळे तो काही क्रिएटीव्ह विचार करु शकेल. आज आम्ही तुमच्यासाठी असाच एक फोटो घेऊन आलो आहेत, जो ऑप्टिकल इल्युजनशी संबंधीत आहे आणि तो तुम्हाला विचार करायला भाग पाडेल.
व्हायरल होणारा हा फोटो एकदम साधा आहे. परंतु यामध्ये पुरुष, स्त्री किंवा दोघे लपलेले असल्याचे सांगण्यात येत आहे. फोटोत दिलसत असलेली गोष्ट एक मास्क आहे, ज्याचं नाव 'मास्क ऑफ लव' आहे, जो ऑप्टिकल इल्युजनचं एक उत्तम उदाहरण आहे.
हा ऑप्टिकल इल्युजन बेस्ट इल्युजन ऑफ द इयर स्पर्धेच्या वेबसाइटवर पोस्ट करण्यात आला होता आणि 2011 मध्ये Gianni Sarcon, कोर्टनी स्मिथ आणि मेरी-जो वेबर यांनी तयार केला होता. ज्यामध्ये तुम्हाला नक्की काय दिसतंय हे शोधून काढायचं आहे.
यावर अनेकांचं म्हणणं आहे की, त्यांनी व्हेनेशियन मास्कमध्ये पुरुषाचा चेहरा पाहिला, तर अनेकांचं म्हणणं असं आहे की, यामध्ये त्यांना एका स्त्रीचा चेहरा दिसला आहे.
एवढंच काय तर, तुम्ही जर हा मास्क किंवा मुखवटा जवळून पाहिला, तर तुम्ही पाहू शकता की, त्यात दोन भिन्न चेहरे दिसतील, जे एक पुरुष आणि एक स्त्री आहेत, जे एकमेकांना किस्स करत आहेत. तुम्हाला यामध्ये पहिल्याच नजरेत काय दिसलं?
ज्या लोकांना अजूनही या फोटोबद्गल कन्फ्यूजन असेल तर, आम्ही तुम्हाला या फोटोमधील किस्स करतानाचं जोडपं ओळखण्यासाठी मदत करणार आहोत. पाहा हा फोटो
चित्रात पुरुष आणि स्त्रीचे दोन चेहरे रंगीत बाह्यरेषेने वेगळे केलेले आहेत आणि ते दोन भिन्न चेहरे आहेत हे लक्षात आल्यावर, तुमचा मेंदू मुखवटाच्या या संभाव्य अर्थांदरम्यान फिरेल, ज्यामुळे तुम्ही दोन्ही चेहरे किंवा एक पाहू शकाल. वैकल्पिकरित्या हा भ्रम बिस्टेबल भ्रमाशी संबंधित आहे, जिथे आपल्या डोळ्यांना विचारांमध्ये दोन समान बदलता येण्याजोग्या स्थिर अवस्था दिसतात.