काँग्रेसकडून 'भारत बचाओ रॅली'चे आयोजन

केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेसकडून आज दिल्लीमध्ये भारत बचाओ रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. 

Updated: Dec 14, 2019, 11:44 AM IST
काँग्रेसकडून 'भारत बचाओ रॅली'चे आयोजन title=
Pic Courtesy: ANI

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेसकडून आज दिल्लीमध्ये भारत बचाओ रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. रामलीला मैदानात  देशभरातील काँग्रेस कार्यकर्ते एकत्र येणारेत. या आंदोलनात काँग्रेसशासित प्रदेशाचे मुख्यमंत्री आणि कार्यकर्ते सहभागी होतील.

रॅलीला काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी संबोधित करतील. आर्थिक मंदी, ढासळती अर्थव्यवस्था, नागरिकत्व सुधारणा कायद्या, बेरोजगारी, महिला सुरक्षा, शेतकऱ्यांच्या समस्यांसारखे अनेक प्रश्न काँग्रेस या रॅलीद्वारे उपस्थित करणार आहेत.

ही रॅली ऐतिहासिक ठरेल असा दावा काँग्रेसने केला आहे. या रॅलीद्वारे दिल्ली विधानसभा निवडणुकीची तयारी सुद्धा म्हटले जाऊ शकते, अशी चर्चा आहे. आता दिल्ली विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यादृष्टीकोणातून काँग्रेस अधिक आक्रमक होण्यासाठी चाचपणी करत आहेत.