Parliament Winter Session 2023: संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मोठा गदारोळ झाला आहे. तब्बल 92 खासदारांचे निलंबन करण्यात आले. संसदेतील ही रेकॉर्ड ब्रेक कारवाई असल्याचे बोलले जात आहे. सभागृहात गोंधळ घातल्याचा आरोप करत लोकसभेतील 31 विरोधी खासदारांना संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले आहे. निलंबित करण्यात आलेल्यांमध्ये काँग्रेस संसदीय पक्षाचे नेते अधीर रंजन चौधरी यांच्यासह डीएमके नेता टीआर बालू यांचाही समावेश आहे. तर, राज्यसभेतील एक विरोधी खासदारलाही गदारोळाच्या आरोपाखाली निलंबित करण्यात आले आहे. सभापतींची ही कृती म्हणजे हुकूमशाही असल्याचा हल्लाबोल निलंबीत खासदारांनी केला आहे.
विरोधी पक्षातील तब्बल 92 खासदारांचं निलंबन करण्यात आलंय. यात लोकसभेतील 47 आणि राज्यसभेतील 45 खासदारांचं निलंबन करण्यात आलंय. काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरींसह आज 33 खासदारांना निलंबित करण्यात आलं. तर त्याआधी 14 खासदारांना निलंबित करण्यात आलं होतं. संसदेत घुसखोरी झाल्यानंतर विरोधक खासदारांनी गोंधळ घातला होता. त्यामुळे ही निलंबनाची कारवाई करण्यात आलीय.
संसदेच्या सुरक्षा मुद्द्याबाबत बोलताना गोंधळ घातल्याबद्दल शुक्रवारी लोकसभा अध्यक्षांनी 13 खासदारांना संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित केले होते. या मुद्द्यावरून विरोधी पक्षाच्या खासदारांनी सोमवारी लोकसभेत गदारोळ घातला. लोकसभेतून निलंबित करण्यात आलेल्या खासदारांनी संसदेच्या पाय-यांवर बसून आंदोलन केलं. यावेळी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी त्यांची भेट घेतली. त्यांनी खासदारांशी चर्चा करून संसदेत प्रवेश केला. निलंबनाविरोधात या खासदारांनी प्रवेशद्वारावर ठिय्या मांडला.
केला. निलंबित खासदारांची शिक्षा आणि गृहमंत्री अमित शहा यांचे लोकसभेतील वक्तव्य बंद करण्याची मागणी हे खासदार करत होते. सभापती ओम बिर्ला यांनी त्यांना अनेक वेळा या खासदारांना शांतता राखण्याचे आवाहन केले. मात्र सभागृहात गोंधळ सुरूच होता.
सभागृहात गोंधळ सुरु असताना संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी मोठी कारवाई केली. गोंधळ घालणाऱ्या सर्व खासदारांना संपूर्ण हिवाळी अधिवेशनासाठी सभागृहातून निलंबित करण्याची मागणी त्यांनी केली. या अपीलावर सभापती ओम बिर्ला यांनी अधीर रंजन चौधरी आणि टीआर बालू यांच्यासह 33 विरोधी खासदारांना लोकसभेतून निलंबित केले आहे. आधीचे 13 आणि आत्ताचे 33 असे मिळून लोकसभेतून निलंबित करण्यात आलेल्या खासदारांची संख्या आता 46 वर पोहचली आहे.