Parrot Typing Message In Whatsapp: व्हॉट्सअॅप हे जगातील सर्वात लोकप्रिय अॅप आहे. जवळपास स्मार्टफोन असलेल्या प्रत्येकाकडे व्हॉट्सअॅप मेसेजिंग अॅप आहे. आता व्हॉट्सअॅपपासून प्राणीही वेगळे राहिलेलं नाही. नुकताच एक हत्ती स्मार्टफोन पाहत असलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर आता एका पोपटाला व्हॉट्सअॅपचं वेड लागल्याचं पाहायला मिळतं. व्हायरल झालेल्या व्हिडीओत पोपट व्हॉट्सअॅप मेसेज टाइप करताना दिसत आहे. हा व्हिडीओ जिन्दगी गुलजार हे नावाच्या ट्विटर हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पोस्ट करताना हा पोपट खूप हुशार असल्याची पोस्ट लिहिण्यात आली आहे. पोपट स्मार्टफोन ओपन केलेल्या व्हॉट्सअॅपसमोर उभा राहतो आणि मेसेज टाइप करतो.
पिवळ्या रंगाचा पोपट आपल्या चोचीने स्क्रिनवरील अल्फाबेट टाइप करतो. त्यानंतर मेसेज सेंड होईपर्यंत मोबाईल स्क्रिनवर चोच मारत राहतो. पण पोपटाने टाइप केलेला मेसेजचा अर्थ कळणं कठीण आहे. त्याने आपल्या चोचेने समोर दिसतील ते अल्फाबेट टाइप केले आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
कितना Talented है ये तोता pic.twitter.com/Z5Y2fQPKhj
— ज़िन्दगी गुलज़ार है ! (@Gulzar_sahab) November 3, 2022
Funny Video: लग्नानंतर नवरी सासरी जाईना, घरच्यांनी केलेली रवानगी पाहून तुम्हीही पोट धरून हसाल
11 सेकंदाचा हा व्हिडीओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे. अनेकांनी व्हिडीओ रिट्वीट देखील केला आहे. एका युजर्सने लिहिलं आहे की, "आता पोपटांचं पण काय खरं नाही. व्हॉट्सअॅपवरच रमतील." दुसऱ्या युजर्सने लिहिलं आहे की, "अरे पक्ष्यांना सुद्धा व्हॉट्सअॅपचं वेड लागलं का?"