मुंबई : देशभरातील लाखो -करोडो पेटीएम युझर्सना मोठा धक्का बसला आहे. कारण आज सकाळपासून पेटीएमची सेवा डाउन झाली आहे. त्यामुळे अनेक युझर्सना ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करण्यात मोठ्या अडचणी य़ेत आहेत. या प्रकरणावर पेटीएमने काय स्पष्टीकरण दिलंय, तसेच ही समस्या कधी सुटणार हे जाणून घेऊयात.
देशभरात आज सकाळपासूनच पेटीएम सेवा डाउन झाली आहे. पेटीएमवरून डिजिटल पेमेंट करण्यात युझर्सना अडचणी येत आहेत. अनेकांनी ट्विटरवर पेटीएमला ट्विट करून आपल्या तक्रारी सांगितल्या आहेत. युझर्सनी पेटीएमला ट्विटवर सांगितले की, त्यांचे खाते अॅपवरूनच लॉग आउट झाले आहे. पैसे ट्रान्सफर होत नाहीत. पेटीएम सेवा ठप्प झाल्याच्या तक्रारी युझर्स करतायत.
पेटीएमचं स्पष्टीकरण
पेटीएम कंपनीच्या वतीने ट्विटरवर याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. कंपनीने ट्विटमध्ये म्हटले आहे की, अॅपमध्ये नेटवर्क त्रुटीमुळे युझर्सना लॉग इन करण्यात अडचण येत आहेत. तसेच युझर्सना पेमेंटही करता येत नाही आहे.
Due to a network error across Paytm, a few of you might be facing an issue in logging into the Paytm Money App/website. We are already working on fixing the issue at the earliest. We will update you as soon as it is resolved
— Paytm Money (@PaytmMoney) August 5, 2022
दरम्यान आउटेज ट्रॅक करणारी वेबसाइट डाउनडिटेक्टरने देखील पुष्टी केली आहे की, भारतात पेटीएम वापरकर्त्यांना समस्या येत आहेत. त्याचा सर्वाधिक परिणाम मुंबई, दिल्ली आणि बंगळुरूसारख्या मोठ्या शहरांमध्ये दिसून येत आहे.
नेटवर्क त्रुटीमुळे पेटीएम युझर्सना ही समस्या भेडसावत आहे.ही समस्या आता कधी सुटणार याबाबत अद्याप तरी पेटीएमने कुठलीच माहिती दिली नाहीए. मात्र लवकरच सेवा पुर्ववत होईल अशी आशा आहे्.