Petrol Price Today: पेट्रोल आज स्वस्त झाले की महाग? जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

Petrol-Diesel Price Today:  तेल कंपन्यांनी 1 नोव्हेंबरपासून तेलात प्रति लिटर 40 पैशांनी दिलासा देणे अपेक्षित होते.जाणून घ्या आज किती रुपयांनी कमी झाले पेट्रोल डिझेलचे दर...

Updated: Nov 9, 2022, 07:29 AM IST
Petrol Price Today: पेट्रोल आज स्वस्त झाले की महाग? जाणून घ्या तुमच्या शहरातील दर title=

Petrol-Diesel Price Today 9th November: दोन दिवसांपूर्वी कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 100 डॉलरच्या जवळ पोहोचली होती. मात्र पुन्हा एकदा कच्चा तेलात घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान  बुधवारी (9 नोव्हेंबर) सकाळी डब्ल्यूटीआय क्रूड प्रति बॅरल $ 88.72 वर होताना दिसले. त्याच वेळी ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $ 95.36 वर पोहोचले. (today petrol diesel price update)

सर्वसामान्यांना दिलासा

ओपेक देशांनी कच्च्या तेलाच्या उत्पादनात कपात केल्याची घोषणा केल्यानंतर कच्च्या तेलात अस्थिरता कायम आहे. तेल कंपन्यांनी 1 नोव्हेंबरपासून तेलात प्रति लिटर 40 पैसे सवलत देणे अपेक्षित होते. मात्र कंपन्यांनी तसे केले नाही. पाच महिन्यांहून अधिक काळ देशांतर्गत बाजारात पेट्रोल-डिझेलच्या दरात (petrol diesel rate) कोणताही बदल न झाल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.

उत्पादन शुल्कात कपात केल्याने पेट्रोल स्वस्त झाले

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात शेवटचा बदल 22 मे रोजी झाला होता. पेट्रोल आणि डिझेलचे दर (petrol diesel price) पाच महिन्यांहून अधिक काळ स्थिर राहण्याची ही पहिलीच वेळ आहे. सरकारने 22 मे रोजी उत्पादन शुल्क कमी केले होते. उत्पादन शुल्कात कपात केल्यामुळे देशभरात पेट्रोल आणि डिझेल स्वस्त झाले. यानंतर महाराष्ट्रात (maharashtra petrol diesel price) तेलावरील व्हॅट कमी करण्यात आला परिणामी किंमती खाली आल्या.

वाचा : 'हे' फूल माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे, अर्पण करताच नशीब बदलेल; व्हाल श्रीमंत! 

शहर आणि तेलाच्या किमती 

- दिल्ली पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
- मुंबई पेट्रोल 111.35 रुपये आणि डिझेल 97.28 रुपये प्रति लिटर
- चेन्नई पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
- कोलकाता पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
– नोएडामध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.96 रुपये प्रति लिटर
- लखनऊमध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर
- जयपूरमध्ये पेट्रोल 108.48 रुपये आणि डिझेल 93.72 रुपये प्रति लिटर
- तिरुअनंतपुरममध्ये पेट्रोल 107.71 रुपये आणि डिझेल 96.52 रुपये प्रति लिटर
- पाटण्यात पेट्रोल 107.24 रुपये आणि डिझेल 94.04 रुपये प्रति लिटर
- गुरुग्राममध्ये 97.18 रुपये आणि डिझेल 90.05 रुपये प्रति लिटर
- बेंगळुरूमध्ये पेट्रोल 101.94 रुपये आणि डिझेल 87.89 रुपये प्रति लिटर
- भुवनेश्वरमध्ये पेट्रोल 103.19 रुपये आणि डिझेल 94.76 रुपये प्रति लिटर
- चंदीगडमध्ये पेट्रोल 96.20 रुपये आणि डिझेल 84.26 रुपये प्रति लिटर
- हैदराबादमध्ये पेट्रोल 109.66 रुपये आणि डिझेल 97.82 रुपये प्रति लिटर
- पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर

 सरकारी मालकीच्या तेल कंपन्या भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL), इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीच्या आधारावर दररोज तेलाच्या किमती जारी करतात. पेट्रोल किंवा डिझेलच्या दरात काही बदल झाल्यास त्याची अंमलबजावणी सकाळी 6 वाजल्यापासून केली जाते. जेव्हा वेगवेगळ्या राज्यांमध्ये व्हॅटप्रमाणे फरक असतो, तेव्हा राज्यांमधील पेट्रोल आणि डिझेलचे दर सारखे राहत नाहीत.

तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल. BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.