Petrol Diesel Price On 14 August : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीवर (Crude Oil Price) सातत्याने परिणाम होत आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या आहेत. कच्च्या तेलाची किंमत सध्या 85 डॉलरच्या वर आहे. बेंचमार्क ब्रेंट क्रूड प्रति बॅरल 86.46 डॉलर आणि डब्ल्यूटीआय क्रूड प्रति बॅरल 82.88 डॉलरला विकले जात आहे. दुसरीकडे भारतीय पेट्रोल-डिझेल बाजाराचा विचार केला तर आजही दरात कोणताही बदल झालेला नाही. 495 व्या दिवशीसुद्धा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Petrol Diesel Price) कोणताही बदल झालेला नाही. सरकारी तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत आज म्हणजेच सोमवारी कोणताही बदल केला नाही.
देशातील तेल कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर करतात. पेट्रोल आणि डिझेलचे दर आज सकाळी 6 वाजता जाहीर करण्यात आहेत. देशाची आर्थिक राजधानी मुंबईसह अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. पेट्रोल आणि डिझेलचे दर कायम आहेत. गेल्या वेळी मे 2022 मध्ये देशात राष्ट्रीय स्तरावर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये बदल झाला होता.
मुंबईत काय आहेत दर?
सोमवारी दिल्लीत पेट्रोलचा दर 96.72 रुपये आणि डिझेलचा दर 89.62 रुपये प्रति लिटर राहिला. मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लीटर दराने उपलब्ध आहे. याशिवाय कोलकाता येथे शुक्रवारी पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.
या शहरांमध्ये बदलले दर
- नोएडामध्ये पेट्रोल 96.65 रुपये आणि डिझेल 89.82 रुपये प्रति लिटर झाले आहे.
- गाझियाबादमध्ये 96.58 रुपये आणि डिझेल 89.75 रुपये प्रति लिटर.
- लखनऊमध्ये पेट्रोल 96.62 रुपये आणि डिझेल 89.66 रुपये प्रतिलिटर झाले आहे.
- पाटणामध्ये पेट्रोल 107.30 रुपये आणि डिझेल 94.04 रुपये प्रति लिटर झाले आहे.
- पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर झाले आहे.
दरम्यान, 7 एप्रिल 2022 पासून पेट्रोलच्या किमतीत कोणतीही वाढ किंवा घट झालेली नाही. 495 व्या दिवशीसुद्धा पेट्रोलचे भाव स्थिर आहेत. 22 मे 2022 रोजी केंद्र सरकारने पेट्रोलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला होता.